नाशिक

म्हणे, पाण्यात हळद टाकल्यावर येऊ शकते संकट!

सोेशल मीडियावर हळदीच्या ट्रेंडचे व्हिडिओ व्हायरल

नाशिक ः प्रतिनिधी
सोशल मीडिया प्लॅटफार्मवर कोणती गोष्ट वा बाब व्हायरल होईल, याचे काहीच बंधन राहिलेले नाही. सध्या पाण्यात हळद टाकून ते पाणी घरात ठेवले तर संकट येऊ शकते, अशा प्रकारचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिक विशेषत: महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मोबाइलचा लाइट सुरू करून त्यावर काचेचा पाण्याचा ग्लास भरून ठेवला जातो. त्यात चमच्याच्या सहाय्याने हळद टाकली जाते. हळद पाण्यात विरघळताना भगवा पिवळा रंग घरभर पसरतो, असे दाखविण्यात आले आहे. कोणतेही आध्यात्मिक, शास्त्रीय कारण नसलेले अर्थहीन ट्रेंड व्हायरल केले जात आहेत. यावर एका ज्योतिषाने असे करणे म्हणजे तुमच्यावर संकट येऊ शकते. नकारात्मक ऊर्जा घरात येऊन तुमची कुंडली खराब होऊ शकते. पत्रिकेतील ग्रह दूषित होऊ शकतात, असा दावा केला आहे. त्यांच्या मते ही एक तांत्रिक क्रिया असून, घरात नकारात्मक ऊर्जा आणि घरात भूत-प्रेताचा वावर वाढू शकतो. याशिवाय पत्रिकेतील गुरू आणि चंद्र ग्रह कमकुवत होऊन वाईट परिणाम होतो, असे सांगण्यात आले आहे. यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, असा दावा एका व्हायरल व्हिडिओतून करण्यात आला आहे.
अनेक ज्योतिषी गुरू आणि चंद्रबळ वाढविण्यासाठी हळदीच्या पाण्याने अंघोळ करण्यास सांगतात. नक्की काय खरे, काय खोटे यावर आता चर्चा सुरू
झाली आहे.
ज्योतिषाच्या या व्हायरल व्हिडिओमुळे मजेदार कमेंट नेटकरी करत आहेत. खोकला झाला तर हळद पाण्यात टाकून आम्ही पितो. ते औषध आहे. त्यात अंधश्रद्धा पसरविण्यात मीडिया पुढे. ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार हळद पाण्यात टाकल्यास नकारात्मक ऊर्जा तयार होते. मग भाजीत टाकल्यास काय होते? अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे, अशा आशयाचे कमेंट व्हायरल होत आहेत. नेटकर्‍यांची चांगले मनोरंजन
होत आहे.
सोशल मीडया हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला असून, दररोज नवनवीन कल्पकता असलेले व्हिडिओ, रील्स व्हायरल होत असतात. एखादा ट्रेंड सुरू झाला की, अनेकांना ट्रेंड फॉलो करण्याचा मोह आवरत नाही. आम्हीही ट्रेंडसोबत आहोत हे दाखविण्याची धडपड सुरू असते. त्यामुळे गाणी, गाण्यातील हुक स्टेप, पदार्थ बनविण्याचे, जोडीचे फोटो, तेव्हा आणि आता असे अनेक प्रकारचे ट्रेंड व्हायरल झाले आहेत. मोठमोठ्या सेलिब्रिटींपासून ते घराघरांत ट्रेेंड फॉलो करण्याचे फॅड नेहमीच
ट्रेंडिंगला असते.

आपल्या संस्कृतीपेक्षा वेगळे दाखविले की, त्याला प्रसिद्धी मिळते. शास्त्रविरोधी सांगत प्रसिद्धी मिळविण्याचा हा फंडा आहे. या गोष्टीला फारसे महत्त्व न दिलेले बरे. अशा व्हिडिओ, रील्सवर क्रिया-प्रतिक्रिया सुरू असतात. या गोष्टीवरून चर्चा व्हावी, हीच अपेक्षा ठेवत असे रील्स बनविलेले असतात.
– अतुलशास्त्री भगरे गुरुजी

ही फक्त अंधश्रद्धा आहे. कोणीही असे प्रयोग करू नयेत. फक्त पाण्यात हळद टाकून कोणतेही ग्रह प्रसन्न होत नसतात.
– शंतनु बुवा लोहणेरकर गुरुजी

 

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

13 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

14 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

14 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

14 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

14 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

15 hours ago