नाशिक

भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनंतर प्रशासन सतर्क; पाहणीचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी
सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण आणि चांदवड तालुक्यांमध्ये 25 ते 28 जुलै 2026 या कालावधीत जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संबंधित तहसीलदारांना तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामस्तरावर जनजागृती, प्रशिक्षण, संरचनात्मक पाहणी आणि सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, प्रभावित गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर सर्व संबंधित यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूकंपाविषयी जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत. प्रत्येक तालुक्यात किमान दहा ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे घेऊन नागरिकांना भूकंपापूर्वीची तयारी आणि भूकंपानंतर घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी आणि स्वयंसेवक यांना आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. शाळा आणि ग्रामपंचायत स्तरावर भूकंप सुरक्षिततेची माहिती व्यापकपणे प्रसारित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे घरे, शाळा, शासकीय इमारती, आरोग्य केंद्रे, धार्मिक स्थळे, पाणीटाक्या, पूल तसेच इतर सार्वजनिक सुविधांना तडे, नुकसान किंवा इतर संरचनात्मक परिणाम झाल्याची शक्यता तपासून तातडीने पाहणी करावी. आवश्यक ती कार्यवाही करून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ सादर करण्याचे निर्देशही देण्यात
आले आहेत.

प्रशासनाचे प्रमुख निर्देश
प्रत्येक तालुक्यात किमान 10 ठिकाणी भूकंप जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम.
शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी आणि स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण.
शाळा व ग्रामपंचायतींमार्फत भूकंप सुरक्षिततेबाबत जनजागृती.
घरे, शाळा, पूल, पाणीटाक्या, आरोग्य केंद्रे आदींची संरचनात्मक पाहणी.
सात दिवसांच्या आत सर्व उपाययोजनांचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करणे.

Administration on alert following mild earthquake tremors; inspection ordered.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago