अफवेवर विश्वास न ठेवण्याचे इंदिरानगर पोलिसांचे आवाहन
इंदिरानगर| वार्ताहर | शहरात मुले चोरी कार्यरत आहे अशी अफवा पसरवली जात आहे. यात कोणतीही सत्यता नसून ही केवळ अफवा आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन इंदिरानगर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.
शहरात लहान मुलांना पळवणारी टोळी कार्यरत आहे असे सध्या सोशल मीडिया वरून पसरवले जात आहे. या अफवा पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्याने या अफवा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. यामुळे निरपराध व्यक्तींना मारहाण होण्याचे प्रकार घडत आहेत. मुले चोरण्यासाठी आल्याचा संशय आल्याने सिडकोत एका महिलेला मारहाण झाली. वडाळा गावात मित्राची चेष्टा करण्यासाठी आईचा बुरखा घालून एक मुलगा वडाळा गावातील जॉगिंग ट्रॅक येथे आला होता. तेथे मित्राची चेष्टा करत असताना आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याच्या पायातील स्पोर्ट शूज ओळखले. बुरखा घातलेली महिला नसून पुरुष आहे हे समजताच लोकांनी त्याच्या चेहऱ्यावरील नकाब बाजूला केला. लहान मुले चोरणारा आहे असा गैरसमज करून त्यांनी त्यास मारहाण केली. सुदैवाने वेळीच पोलीस घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.
शहरातील अशा वारंवार होणाऱ्या घटना लक्षात घेऊन या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन इंदिरानगर पोलिसांनी
नागरिकांना केले आहे. अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तसेच कायदा हातात घेऊन मारहाण करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना काही संशयास्पद व्यक्तीविरुद्ध शंका आल्यास त्यास कोणत्याही प्रकारची मारहाण अगर इजा न करता त्याची माहिती तात्काळ डायल ११२ वर किंवा इंदिरानगर पोलीस ठाणे क्रमांक ०२५३२३२८८३३ किंवा मुख्य नियंत्रण कक्ष ०२५३२३०५२३३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांनी केले आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…