उत्तर महाराष्ट्र

ट्रक चालकाचा हृदयविकाराने मृत्यू

ट्रक चालकाचा हृदय विकाराने मृत्यू

लासलगाव : समीर पठाण

विष्णुनगर विंचूर येथे कांदे भरण्यासाठी आलेल्या ट्रक चालकाचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली असल्याची माहिती लासलगाव पोलिस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ दिली असून या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत ट्रकचालक मुसबिर रहेमान नुरसेद अली वय ४८ रा.भगवान गोला मदिशा संभाली जिल्हा मुर्शिदाबाद राज्य पश्चिम बंगाल हे विष्णुनगर विंचूर येथे असलेल्या विकास ट्रेडिंग कंपनी या कांद्याच्या खळ्यावरून कांदा वाहतुकीचे भाडे मिळाल्याने कांदे भरण्यासाठी आले होते.ट्रक मध्ये कांदे भरल्यानंतर ट्रकच्या ताडपत्री ला दोरीने बांधत असताना मयत यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना निफाड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले केल्यावर तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करत आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago