मुंबई : प्रतिनिधी
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन करुन जोरदार घोषणाबाजी केली. शेतकर्यांची कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती करा, यासाठी विरोधक आक्रमक झाले. मात्र त्याचा सत्ताधार्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. सरकारच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रेय भारणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. महायुती सरकारनं 56 लाख शेतकर्यांची कर्जमाफी केलेली आहे. आम्ही शेतकर्यांसोबत उभे आहोत, असा हल्लाबोल विरोधकांवर केला. महाराष्ट्रात सरकारतर्फे करण्यात आलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नसून फसवणूक आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यस्त आहेत. सातबारा कोरा करू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झालेले नाही, असा आरोप शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला. आमदार रोहित पवार यांनी सरकारने फसवणूक व विश्वासघात केल्याचा आरोप केला.
Agitation for farm loan waivers; opposition turns aggressive.