अतिरिक्त पोलिस महासंचालक सरंगल उपस्थित राहणार
नाशिक : प्रतिनिधी रस्ते अपघात कमी व्हावेत तसेच त्यात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या शून्यावर यावी आणि वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी अंबड इंडस्ट्रीज अंड मॅन्युफॅक्चर असोसिएशन(आयमा)च्या पुढाकाराने मंगळवार दिनांक 17 मे रोजी दुपारी 3.30 वाजता आयमाच्या रिक्रिएशन हॉलमध्ये जनजागृती मोहीम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी दिली.
या कार्यक्रमात नासिक फर्स्ट, ट्रॅफिक एज्युकेशन,नाशिक महानगरपालिका,नासिक पोलिस, स्वयंसेवी संस्था रिसिलियंट इंडिया यांचाही सक्रिय सहभाग आहे. चर्चासत्रात अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल,पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे,पोलिस अधीक्षक सचिन पाटील,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी बी.एस.साळुंखे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए.बी.शिंदे,अंबडचे पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख, सातपूरचे पोलिस निरीक्षक चव्हाण, आयमाचे सरचिटणीस ललित बूब,बीओटी चेअरमन धनंजय बेळे,आयमाच्या रस्ते वाहतूक सुरक्षा नियोजनाचे अध्यक्ष गौरव धारकर आणि रिसिलियंट इंडियाचे राजीव चौबे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत,असेही निखिल पांचाळ यांनी पुढे नमूद केले.