वन प्लस नॉर्ड सीई-2 फाइव्ह जी फोनवर 12 हजारांपर्यंत डिस्काउंटनवी दिल्ली : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला मोठा ब्रँड हवा असेल, तर तुमच्यासाठी वन प्लस नॉर्ड सीई-2 फाइव्ह जी हा एक चांगला पर्याय असू शकतो. वन प्लसचा हा स्मार्टफोन 5जी कनेक्टिव्हिटीसह येतो. हा वन प्लसचा फोन ऍमेझॉनवर 12,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह मर्यादित कालावधीत खरेदी करता येईल. फोनमध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी सेन्सर, 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. वनप्लस नॉर्ड सीई 2 5जी स्मार्टफोन सध्या ऍमेझॉनवर 24,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. ही किंमत 8 जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. परंतु जर तुमच्याकडे जुना फोन असेल आणि तुम्हाला ते एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी करायचे असेल तर तुम्हाला 10,650 रुपयांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, तुम्हाला खउखउख बँक क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड एचख व्यवहारांद्वारे फोन खरेदी केल्यास 1,5000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. 4,167 रुपयांपर्यंतच्या नो-कॉस्टवर फोन घेण्याची संधी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *