पक्ष कार्यालयात नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत शिंदेसेनेच्या गटनेतेपदी पक्षाचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख व प्रभाग सातमधून निवडून आलेले अजय बोरस्ते यांची एकमताने निवड
करण्यात आली.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असल्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या आदेशाने व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, जिल्हा निरीक्षक आमदार सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना गटनेतापदाची निवड करण्यात आली. गटनेतेपदी सर्व नगरसेवकांच्या एकमताने अजय बोरस्ते यांची निवड करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाचे 26 नगरसेवक निवडून आले असून, महापालिकेत नंबर दोनचा पक्ष ठरला. बोरस्ते यांच्या निवडीला नगरसेविका सुवर्णा मटाले, दीपक दातीर, रमेश धोंगडे, राहुल दिवे, रंजना बोराडे, समीर कांबळे, किरण गामणे यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
पक्षाने व सर्व नगरसेवकांनी जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे, तो सार्थ ठरवणार आहोत आणि संघटना व नाशिकच्या विकासासाठी सदैव तत्पर राहू.
– अजय बोरस्ते, गटनेते, शिंदेसेना
Ajay Boraste elected as Shiv Sena group leader