नाशिक

अक्षय मुहूर्तासाठी बाजारपेठा सज्ज

नाशिक ः प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. बाजारात कराकेळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. पितरांच्या नावाने घागर भरून पूजा केली जाते. त्यामुळे अक्षयतृतीयेला कराकेळीचे महत्त्व आहे.
शहर आणि उपनगरांतील विविध ठिकाणी कराकेळी, पूजासाहित्य विक्रीस उपलब्ध झाले आहे. कराकेळीची किंमत पन्नास ते शंभर रुपयांपर्यत आहे. इंधन दरवाढीमुळे पूजासाहित्याच्या दरातही वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आंबा नुकताच बाजारात दाखल झाला असून, अक्षयतृतीयेपासून आंबा खाण्यास सुरुवात केली जाते. आंब्याची आवक कमी असल्याने भाव चढे आहेत. रत्नागिरी हापूस, लालबाग, बदाम आदी आंब्यांचे प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. अक्षयतृतीयेला खानदेशात आखाजी संबोधले जाते. पितरांना पुरणाचे आणि मांड्याचा नैवेद्य दाखविला जातो. खानदेशात आखाजीला झोकेही खेळण्याचा प्रघात आहे. मोठ्या प्रमाणात झोके खेळले जातात.
सोने, गृह, वाहन खरेदी
या सणाला प्रामुख्याने सोने, गृह, वाहन खरेदी केली जाते. त्यामुळे कोरोना काळात मंदावलेली अर्थव्यवस्था सणांनिमित्त रुळावर येऊन बाजारास बुस्ट मिळणार आहे. रशिया, युक्रेन युद्ध, वाढलेली महागाई, इंधनदरवाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रात झाला आहे. परंतु भारतीयांची मानसिकता उत्सवप्रिय असल्याने सणाला नवीन कार्याचा शुभारंभ करतांना खरेदी केली जाते. त्यामुळे बाजारभाव वाढले तरी निमित्ताने खरेदी करण्याची हौस केली जाते. त्यामुळे नवीन वस्तू, घर, वाहन, सोन्याची बाजारपेठ तेजीत राहण्याची शक्यता आहे. अक्षय आनंदाचा, उल्हासाचा सण असल्याने या दिवशी जे शुभ कार्य केलं जातं त्याचं फळ हे अक्षय मिळतं. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होणार नाही ते फळ. याच कारणामुळे हा दिवस हिंदू धर्मात शुभ मानला जातो. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसर्‍या दिवशी अक्षयतृतीया साजरी केली जाते.
सराफ बाजाराला झळाळी!
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर सराफी पेढ्यांना झळाळी प्राप्त होणार आहे. अक्षयतृतीयेला सोने खरेदीला विशेष महत्त्व असल्याने खरेदी केली जाते. सोन्याचे भाव मार्चमध्ये पंचावन्न हजारपार गेले होते. गेल्या काही आठवड्यात सोने दरात काहीशी घट झाल्याने ग्राहकांची सणाच्या मुहूर्तावर दागिने खरेदी करण्याची शक्यता असल्याचे सराङ्ग व्यावसायिकांनी सांगितले. शुद्ध सोने दर प्रतितोळा 53,560 असून, 22 कॅरेट सोन्याचा भाव 51,500 इतका आहे. चांदीचा दर 67 ते 69 हजार इतका आहे. अक्षयतृतीयेला सोने खरेदी केल्यावर अक्षय टिकते, अशी भावना असल्याने सोनेदरवाढ झाली तरी खरेदी केली जाते. लग्नकार्य, सणसमारंभ विशेषप्रसंगी सोने घेतले जाते. भारतीयांची मानसिकता सोने, दागिने पतप्रतिष्ठा तसेच सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. गेल्या काही महिन्यांत सोने-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
असा आहे मुहूर्त
एकूण साडेतीन मुहूर्त आहेत. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी हे तीन पूर्ण मुहूर्त तर दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. मंगळवारी (3 मे) अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा पाठ करून मंत्रपठण करण्यात येते. करावे. विष्णू, लक्ष्मीमाता आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. या वर्षी पूजनाचा शुभमुहूर्त सकाळी 5.19 ते दुपारी 12.18 या वेळेत आहे. हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अक्षयतृतीया हा अत्यंत शुभ दिवस आहे. याच दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला. तसेच बसवेश्वर यांचा जन्म झाला. वेदमहर्षी व्यास आणि गणेश यांनी महाभारत लेखन याच दिवशी सुरू केले होते. अन्नपूर्णा देवी याच मुहूर्तावर प्रकट झाली होती, अशी मान्यता आहे. वैशाख महिना उष्ण असल्याने माठातील पाणी पिण्यास प्रारंभ करावा.
– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

 

यंदाच्या अक्षय-तृतीयेला सोनेदरात दोन ते तीन हजारांची घट झाली असून, सणाचा मुहूर्त असल्याने सोने खरेदीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे चित्र आहे. मार्चमध्ये सोने 55 हजार पार गेले होते. आता भाव कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोने दरवाढीवर होत असतो.
– गिरीश नवसे सराफ असो.)

Bhagwat Udavant

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

4 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

4 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

14 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago