संपादकीय

भारतीय वैज्ञानिकाचा थक्क करणारा शोध

ष्टीच्या आरंभापासूनच मानवाच्या कल्पनाशक्तीला गोंधळात टाकणारे, विस्मयकारी आणि अनंत अशा अंतराळाचे गूढ अजूनही वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा महत्त्वाचा विषय आहे. आपल्या डोळ्यांसमोर असलेला अथांग आकाश आणि त्यामागील अनोळखी जग सदा आपल्याला आकर्षित करत आले आहे. चंद्र, मंगळ आणि अन्य ग्रहांपर्यंत मानवी यान पोहोचलं असलं, तरीही अंतराळातील रहस्य, जीवनाची शक्यता आणि प्रगत सभ्यतांचे अस्तित्व यासंदर्भातील प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत.
या पार्श्वभूमीवर केंब्रिज विद्यापीठात कार्यरत असलेले भारतीय वंशाचे खगोलशास्त्रज्ञ निक्कू मधुसूदन यांनी दिलेल्या संशोधनाने संपूर्ण जगाला अचंबित करून टाकले आहे. त्यांच्या टीमने बाह्यग्रह घ2-18इ वर काही असे संकेत शोधले आहेत, जे जीवनाच्या अस्तित्वाच्या शक्यतेकडे ठोस इशारा करतात. हे संशोधन केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही, तर ते मानवजातीच्या भविष्यासाठीदेखील फार मोठं पाऊल ठरू शकतं.
घ2-18इ हा ग्रह पृथ्वीपासून तब्बल 120 प्रकाशवर्षे दूर आहे. तो एक हायसिअन वर्ल्ड मानला जातो, म्हणजे असं स्थान जिथं हायड्रोजनयुक्त वातावरण असून, महासागरांसारख्या जलरूप साठ्याचं अस्तित्व असण्याची शक्यता आहे. हाच ग्रह वरुण ग्रहापेक्षा लहान असला तरी तो पृथ्वीपेक्षा सुमारे अडीचपट मोठा आहे. या ग्रहाभोवती एक लाल तारा परिभ्रमण करत असून, हा तारा आपल्या सूर्यापेक्षा लहान, थंड आणि दीर्घकाळ टिकणारा आहे. यामुळे घ2-18इ वर स्थिर वातावरण टिकून राहण्याची शक्यता अधिक आहे.
ऊचड वायूचा स्फोटक संकेत
या संशोधनात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे डायमिथाइल सल्फाइड (ऊचड) नावाच्या वायूचा शोध. ऊचड ही वायू पृथ्वीवर फक्त सूक्ष्म जीवजंतू आणि सजीव प्रक्रियांद्वारे तयार होते. समुद्रातील प्लवक, वनस्पती आणि जीवजंतूंमधील जैविक घडामोडींमध्ये ऊचड तयार होतं. त्यामुळे या वायूचा शोध लागणं म्हणजेच त्या ग्रहावर जीवनाचं अस्तित्व असू शकतं, असा प्राथमिक निष्कर्ष वैज्ञानिकांनी मांडला आहे.
प्रा. मधुसूदन यांनी ’कूलशरप थेीश्रवफ ही संकल्पना मांडली आहे, जी आजपर्यंतच्या खगोलशास्त्रात एक नवीन दृष्टिकोन देणारी ठरते. हायसिअन वर्ल्ड म्हणजे असे ग्रह जिथे हायड्रोजनयुक्त वातावरण असतं आणि द्रवरूप महासागरही संभवतात – या वातावरणात जीवनाचा जन्म आणि उत्क्रांती होण्यासाठी उपयुक्त अशा गोष्टी असू शकतात. यातील आणखी एक विशेष बाब म्हणजे घ2-18इ ग्रहाच्या वातावरणात आढळलेल्या आण्विक छटा. वैज्ञानिक विश्लेषणानुसार, त्या छटा अशा संयुगांची आहेत, ज्या केवळ सजीव प्रक्रियांच्या घडामोडींमुळे तयार होतात. त्यातही विशिष्ट अशा बायोसिग्नेचर संकेतांची उपस्थिती अधिक लक्षवेधी आहे. यामुळे एलियन जीवनाच्या शोधात ही एक ऐतिहासिक आणि निर्णायक पायरी ठरण्याची शक्यता आहे.
भारतीयांची प्रतिभा
या महत्त्वपूर्ण शोधामागे असलेले वैज्ञानिक निक्कू मधुसूदन हे मूळ भारतीय असून, आज केंब्रिजसारख्या नामवंत विद्यापीठात संशोधन करत आहेत. त्यांचे कार्य हे केवळ विज्ञानासाठी नव्हे, तर भारतासारख्या देशाच्या वैज्ञानिक प्रतिभेचंही प्रतीक आहे. त्यांच्या या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, भारतात प्रतिभेची कमी नाही, अभाव आहे तो योग्य संधी, सुविधा आणि मेंदू पलायन थांबवण्याचा.
अंतराळातील जीवनाच्या शोधासाठी वैज्ञानिक आज विविध ग्रह व उपग्रहांचा अभ्यास करत आहेत. उदाहरणार्थ, 2015 मध्ये नासाच्या एका उपग्रहाने मंगळ ग्रहावर प्राचीन महासागर असल्याचं अनुमान व्यक्त केलं होतं. पृथ्वीच्या आर्कटिक महासागरापेक्षाही मोठा जलसाठा कधी काळी तिथं होता. मात्र, सुमारे 300 कोटी वर्षांपूर्वी तो महासागर नाहीसा झाला आणि त्यातील 87 टक्के पाणी गायब झालं. काही तज्ज्ञांच्या मते, हे पाणी खनिजांमध्ये मिसळलं किंवा अंतराळात उडून गेलं असावं. तसंच शनीच्या उपग्रह टायटनवरदेखील मिथेन वायूचा साठा, नद्या, सरोवरे आणि वातावरणाचं अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे टायटन ही पृथ्वीशिवाय जीवनासाठी योग्य दुसरी जागा असू शकते, असं वैज्ञानिक मानतात.
अजूनही बरेच अनुत्तरीत प्रश्न…
या सर्व संशोधनामुळे एक गोष्ट निश्चित आहे – अंतराळात जीवन असण्याची शक्यता ही आता केवळ काव्यगंधीत कल्पना उरलेली नाही, तर ती एक वैज्ञानिक शक्यता म्हणून गंभीरतेने घेतली जात आहे. मात्र, याचे अंतिम निष्कर्ष अजून दोन-तीन वर्षांनंतर स्पष्ट होतील. तोपर्यंत जगभरातील वैज्ञानिक या संशोधनाच्या प्रत्येक पावलाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. मानवाच्या हजारो वर्षांच्या जिज्ञासेचा, श्रद्धेचा आणि विज्ञानाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आता जवळ येतोय असं म्हणायला हरकत नाही. एलियन जीवन खरंच अस्तित्वात आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या उंबरठ्यावर आपण आहोत. घ2-18इ या ग्रहावर जीवनासारख्या छटांचा शोध लागणं हे केवळ एक वैज्ञानिक शोध नसून, मानवजातीच्या अस्तित्वाचा एक संभाव्य आरसा ठरू शकतो. प्रा. निक्कू मधुसूदन आणि त्यांच्या पथकाने उभारलेल्या या वैज्ञानिक शोधयात्रेमुळे पुन्हा एकदा हे सिद्ध होतं की, कल्पकतेला सीमा नसते आणि ज्ञानाच्या आकाशात भारताचे झेंडे मोठ्या अभिमानाने फडकू शकतात.

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

14 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

14 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

14 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

14 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

14 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

15 hours ago