अंबडला हॉटेल चालकासह कर्मचाऱ्यांना टवाळखोरांनी केली मारहाण,वेटर गंभीर जखमी ,घटनेचा सीसीटीव्ही वायरल,
सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नम्रता पेट्रोल पंपाजवळुुन अंबड गावाकडे जाणाऱ्या मुख्य रोडवरील हॉटेल महाराजांमध्ये रात्री उशिरा दारू न दिल्याने सहा ते आठ टवाळखोरांनी हॉटेल बार मालकासह येथील काम करणाऱ्या चार ते पाच कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी घडली टवाळखोरांनी केलेल्या या मारहाणीत हॉटेलमधील वेटर जखमी झाला असून याच्या डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे दिवसभर सोशल मीडियावर हा व्हिडिओ पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारांचा वाढता वावर व टवाळखोरांची दहशत यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेत एका राजकीय पदाधिकाऱ्याने दबाव तंत्र आणले असल्याची चर्चा आहे. यामुळे पोलीस ठाण्यात या घटने प्रकरणी गंभीर गुन्हा नोंद झाला नसल्याचे फिर्यादी भागिनाथ भास्कर लोखंडे वय ३२, मुळगाव कन्नड छत्रपती संभाजीनगर) यांचे म्हणणे आहे. एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी बार मालकास व कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या गणेश आहेर (२६) मनीष हिवाळे (२६) विवेक वाघ (२५) सागर बाविस्कर (२४) निखिल खैरनार (२३) गणेश आहेर, संजोग देसाई हे सर्व राहणार अंबड सिडको येथील आहे
. या संशयतांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केली आहे. यातील दोन संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती एमआयडीसी चौकीचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे यांनी दिली आहे.
नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार नाशिक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन…
मंत्रिमंडळाचा निर्णय; दुकानदारांमध्ये नाराजी नाशिक : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या…
नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर नाशिक : प्रतिनिधी शहरात होणार्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या…
अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दशकापासून…
मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई सिन्नर : प्रतिनिधी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा…
गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती सटाणा ः प्रतिनिधी ईव्हीएम मॅनेज…