मनमाड जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार
बघा व्हिडिओ
मनमाड: प्रतिनिधी
मनमाड जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार बघायला मिळाला हा ट्रक जात असतांनाच काही अंतरावर जाऊन पलटी झाला सुदैवाने यात जीवित हानी टळली असली तरी यात चालक किरकोळ जखमी झाला आहे .ट्रकच्या मागे दुचाकी वरून चालणाऱ्या तरुणाने हा सर्व थरार मोबाईलमध्ये कैद केला असुन याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार पाहवयाला मिळाला असून ट्रक मध्ये क्षमते पेक्षा जास्त माल भरलेला होता त्यामुळे ट्रक एका बाजूने झुकलेला असताना देखील चालकाने त्याची पर्वा न करता ट्रक चालवीत होता अखेर मनमाड पासून काही अंतरावर एका बाजूने तोल जाऊन धावता ट्रक पलटी झाला.सुदैवाने ट्रक डाव्या बाजूने पलटी झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ट्रक उलटला. त्यामुळे
चालक जखमी झाला असून ट्रकचे देखील मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे एका बाजूने ट्रक झुकल्याचे पाहून त्याच्या मागे दुचाकी वरून चालणाऱ्या तरुणाने ट्रकचा थरार त्याच्या मोबाईल मध्ये कैद केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
ओव्हरलोड माल भरून अनेक ट्रक हायवे वरून धावत असतांना देखील आरटीओ, वाहतूक पोलीस करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…