सिडको : दिलीपराज सोनार
शहरात घरफोडी, चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, अंबड एमआयडीसी मधील इंडियन बँक चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे, आज सकाळी बँक कर्मचारी बँकेत आले असता हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे वर्षभरात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, चोरट्याने काही लांबवले का याचा शोध घेतला जात आहे.