नाशिकरोड : प्रतिनिधी
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलला नाशिकरोडला भीमसैनिकांनी अलोट गर्दी करीत अभिवादन केले. सायंकाळी विविध भागांतून सुमारे 35 मिरवणूक चित्ररथ सहभागी झाले होते.
गेल्या अनेक काळापासून नाशिकरोड भागात साजरी होणारी जयंती ही ऐतिहासिक जयंती होत असल्याने जिल्हाभरातून काही लाख भीमसैनिक हजेरी लावत असतात. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’ अशा घोषणा देत भीमसैनिकांनी व विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 13) रात्री 12 वाजेच्या दरम्यान सुभाष रोड येथे असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. त्याचप्रमाणे सकाळी अनेक भागांतील युवक-युवतींनी मोटारसायकल रॅली काढली. सुभाष रोड येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करत अनेक भीमप्रेमींनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. सायंकाळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय लोटला होता. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सरोज अहिरे यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. सार्वजनिक जयंती समिती अध्यक्ष आकाश भालेराव, समितीचे प्रमुख संजय भालेराव, सनी वाघ, कामगार नेते रामबाबा पठारे, भारत निकम, हरीश भडांगे, अमोल पगारे, समीर शेख, शेखर भालेराव, राजाभाऊ वानखेडे, बाळासाहेब सोनवणे, संतोष पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराज गायकवाड, पीपल्स रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अॅड. शशिकांत उन्हवणे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बागूल, किशोर खडताळे, रोहित निरभवणे, अविनाश वाघ, बाळासाहेब भालेराव, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागूल, विशाल घेगडमल, महेंद्र साळवे, महेंद्र तायडे, राजाभाऊ पगारे, विशाल गांगुर्डे, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष भारत पुजारी, राजाभाऊ गांगुर्डे, प्रकाश वाजपेयी, शुभम पगारे, भारतीय बौद्ध महासभेचे चौदास भालेराव, राजू जगताप, बाळासाहेब अहिरे, प्रभाकर कांबळे तसेच महिला आघाडीच्या नयना वाघ, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, विमल तडवी, सुचित्रा गांगुर्डे आदींसह शेकडो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बसस्थानकाजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उत्सव समितीचे संयोजक सुनील संपत कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी समितीच्या अध्यक्षा कल्पना दोंदे, अतुल भावसार, मुकेश वीर, अॅड. पल्लवी उन्हवणे, अॅड. पुष्पा ढवळे, अॅड. शुभांगी गीत, राजश्री साळवे, चैताली सोनवणे आदी उपस्थित होते. समितीच्या वतीने 135 तोफांची सलामी व फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुकीच्या चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार्या भीमप्रेमींना विविध सामाजिक संघटना, समितीच्या वतीने अन्नदान, सरबत, थंड पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले. पोलिस ठाण्यात सुमारे 90 मंडळांची नोंद करण्यात आली होती. यामध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्यात 47 तर उपनगर पोलिस ठाण्यात 23 मंडळांची नोंद करण्यात आली असून, मिरवणुकीत 35 मंडळांनी सहभाग घेतला होता.
यावेळी सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, करन्सी नोट मित्रमंडळ, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन एम्प्लॉइज, बालाजीनगर मित्रमंडळ, पीपल्स रिपाइं मित्रमंडळ, नालंदा मित्रमंडळ, कैलासजी मित्रमंडळ, जेलरोड युवा फाउंडेशन, समता युवा मित्रमंडळ, पेंढारकर कॉलनी मित्रमंडळ, प्रबुद्ध मित्रमंडळ, रिपब्लिकन एम्प्लॉइज
फेडरेशन, न्यू क्रांती फ्रेंड सर्कल, माता रमाई महिला मंडळ, सुभाष रोड तरुण मित्रमंडळ, भीम जन्मोत्सव समिती, माता यशोधर मित्रमंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समिती सिद्धार्थनगर, धम्मरत्न मित्रमंडळ, त्रिशरण मित्रमंडळ, सार्वजनिक कला, क्रीडा मित्रमंडळ, सम्राट मित्रमंडळ, भीमगर्जना मित्रमंडळ आदी मंडळं सहभागी झाले होते.
Ambedkar Jayanti in full swing in Nashik Road area