तेलंगणात मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका नादुरुस्त होते तेव्हा

रेड्डी कुटुंबाने अनुभवला महाराष्ट्र धर्म

दिक्षी – मुंबईवरून परिवारातील मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घेऊन तेलंगणातील गावी जाणाऱ्या रेड्डी परिवाराची रुग्णवाहिका मंगळवारी रात्री १२.३० वाजता चांदोरी येथे •नादुरुस्त झाली. त्यामुळे कुटुंबियांना काय करावे हे समजेना. अशातच येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख सदस्य किरण भुरकुडे केशव झुरडे शुभम गडाख हे मदतीला धावले. या सदस्यांच्या समयसूचकतेमुळे आमदार दिलीप बनकर यांनी स्वखर्चाने दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. अपरिचित ठिकाणी मिळालेल्या या मदतीने रेड्डी कुटुंब गहिवरून गेले.

मूळचे तेलंगणा येथील रहिवासी असलेले रामचंद्र रेड्डी यांचे कॅन्सरने टाटा हॉस्पिटल येथे निधन झाले. यांचा मृतदेह रूग्णवाहिकेत घेऊन परिवारातील विश्वनाथ रेड्डी, सुगंधा सोमवारी (दि. २५) सायंकाळी रेड्डी आदी सदस्य रामचंद्र रेड्डी मुंबई येथून अंत्यसंस्कारासाठी तेलंगणातील मूळगावी निघाले. चांदोरी परिसरात आले तेव्हा रात्रीचे १२.३० झाले होते. येथील सुकेणे फाट्यावर तंदूर हॉटेलजवळ त्यांची रुग्णवाहिका अचानक बंद पडली. चालकाने प्रयत्न करूनही ती काही केल्या सुरू होईना. अखेर रेड्डी परिवारातील सदस्यांनी तंदूर हॉटेलचे मालक शुभम गडाख यांना मदतीची याचना केली. गडाख यांनी तातडीने चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गडाख यांना माहिती दिली. सागर गडाख हे सदस्यांसह घटनास्थळी हजर झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी दुसरी रुग्णवाहिका मिळविण्यासाठी प्रयत्न केले. १०८ ला फोन केले. पण महाराष्ट्राबाहेर मिळालेल्या मदतीने रेड्डी परिवाराचे सेवा नसल्याचे सांगितल्याने खासगी रुग्णवाहिकांना फोन केले. पण भाडे २५ ते ३० हजार सगितल्याने प्रश्न सुटण्याऐवजी जटिल बनत चालला होता. अखेर सागर गडाख यांनी रात्री एक वाजता आमदार दिलीप बनकर यांना फोन करून वास्तव स्थिती सांगितली. आमदार  बनकर यांनी रेड्डी परिवाराच्या मदतीला धावून जात पिंपळगाव बसवंत येथून खासगी रुग्णवाहिका स्वखर्चाने पाठवत रेड्डी परिवाराला मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. सागर गडाख व सहकाऱ्यांनी रुग्णवाहिकेतून रामचंद्र रेड्डी यांचे शव नवीन रुग्णवाहिकेत ठेवून दिले. तेलंगणाकडे मार्गस्थ होताना रात्रीच्यावेळी अनोळख्या ठिकाणी मदत मिळाल्याने रेङ्ङी परीवाराला गहिवरून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *