नाशिक

ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेत कर्मचाऱ्याची आत्महत्या

सटाणा : प्रतिनिधी

ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी शिपाई समाधान निंबा पाटील (वय ३७) यांनी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक कक्षात गळपास घेवून आत्महत्या केल्याची घटना बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथे उघडकीस
आली आहे. आर्थिक विंवचे नेतुन आत्महत्या केल्याचा अंदाजवर्तविला जात आहे.
याबाबतची सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज बुधवार दि . २० रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंपळकोठे ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी सुरेश गांगुर्डे कार्यालयात गेले . संगणक कक्षात प्रवेश करताच त्यांना कार्यालयातील शिपाई कर्मचारी समाधान निंबा पाटील यांने संगणक कक्षाच्या छताला असलेल्या पंख्याला गळपास घेतल्याचे दिसून आले . गांगुर्डे यांनी तात्काळ पोलिस पाटील शिला भामरे यांना पाचारण करून जायखेडा पोलिसांना खबर दिली . समाधान पाटील हे ग्रामपंचायत मध्ये शिपाई पदावर मानधनावर नोकरी करित होते . त्यांना ४६०० रूपये इतके मानधन मिळत होते . त्या मानधनावर त्यांचा प्रपंच होत नसल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी शक्यता व्यक्त केली आहे . समाधान पाटील यांच्या पश्चात आई – वडील , पत्नी , एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे .

Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

17 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago