नाशिक

त्र्यंबक देवस्थानाच्या कारभाराची होणार चौकशी

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकाला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान , त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे भाविकांची लूट, व्हीआयपी पासेसमधील अनियमितता आणि सुरक्षारक्षकांकडून होणार्‍या गैरवर्तनाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. देवस्थानाच्या एकूण कार्यपद्धतीचा सखोल पंचनामा करून आर्थिक व्यवहार, पासेसमधून होणारे उत्पन्न आणि भाविकांना दिल्या जाणार्‍या सोयीसुविधांची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. उपविभागीय अधिकारी त्र्यंबकेश्वर चौकशी करणार असून, 21 दिवसात चौखशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात रविवारी (दि. 1) एका परप्रांतीय भाविकाला सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला. संबंधित भाविक गर्भगृहात दर्शनासाठी गेला असता झालेल्या वादातून त्याला ढकलण्यात आले व मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर येथे दर्शन लवकर व्हावे यासाठी भाविकांकडून अवास्तव रकमा घेतल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. पैसे न देणार्‍या भाविकांना तासनतास रांगेत थांबवले जाते, अशीही नाराजी व्यक्त होत आहे. याशिवाय सुरक्षारक्षकांच्या अरेरावीचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वरला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवस्थानातील व्यवस्थापन, पारदर्शकता आणि भाविकांना दिल्या जाणार्‍या सुविधा यामध्ये तातडीने सुधारणा करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. चौकशीनंतर आवश्यक ती सुधारात्मक पावले उचलली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

त्र्यंबकेश्वरमधून दिले जाणारे पासेस, त्यातून मिळणारा निधी, दर्शनाच्या ढिसाळ व्यवस्थेसह येथील एकूणच आर्थिक बाबींचीदेखील चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांकडून आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी त्र्यंबकेश्वरच्या एकूण कारभाराची चौकशी करतील.
– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

 

An inquiry will be conducted into the administration of Trimbak Devasthan.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago