संपादकीय

प्रेरणादायी प्रवास

डॉक्टर ते नगरसेविका : डॉ. पूनम महाले यांचा प्रेरणादायी प्रवास

नाशिक महानगरपालिकेतील उच्चशिक्षित नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. पूनम योगेश महाले यांचा प्रवास हा शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम मानला जातो. वैद्यकीय क्षेत्रातील समृद्ध अनुभव, समाजाशी असलेली घट्ट नाळ आणि सेवाभाव यांच्या बळावर त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
डॉ. पूनम महाले या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.व्ही. एम. पवार यांच्या कन्या आहेत. त्यांच्या वडिलांचे शिक्षण व कार्यकाळ काही काळ ऑक्सफर्ड येथे असल्याने त्यांचे सुरुवातीचे बालपण तिथे गेले. त्यानंतर डॉ. व्ही. एम. पवार हे परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. वडिलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर लहानपणापासूनच प्रभाव पडला. ज्ञानाची ओढ, शिस्त आणि समाजाबद्दलची जाणीव हे संस्कार त्यांना घरातूनच लाभले. त्यांचे बालपण आणि शिक्षण विविध शहरांत झाले. प्राथमिक शिक्षण ऑक्सफर्ड येथे झाले, तर पुढे परभणी, फरिदाबाद, राहुरी, पुणे आणि दिल्ली येथे त्यांचे शिक्षण झाले. इयत्ता दहावी आणि बारावीचे शिक्षण त्यांनी राहुरी (जि. अहमदनगर) येथे पूर्ण केले.
वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी नाशिक येथील एमव्हीपी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालय, तसेच जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि जे. जे. रुग्णालय येथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. या काळात प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून समाजसेवेची वाट निवडली. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा तसेच इतर दुर्गम भागांत नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरांत सहभागी होत त्यांनी अनेक गरजू रुग्णांना मोलाची सेवा दिली. सन 2004 मध्ये त्यांचा विवाह डॉ. योगेश महाले यांच्याशी झाला आणि त्यानंतर त्या नाशिक येथे स्थायिक झाल्या. त्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले यांच्या सून आहेत. त्यांच्या निर्णयामुळेच त्या राजकारणात सक्रिय झाल्या.
35 सदस्यांच्या एकत्र कुटुंबाचा भाग बनूनही त्यांनी शिक्षण आणि सेवाभावाची वाट खंडित होऊ दिली नाही. त्यांनी हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये एमबीए, तसेच मेडिको-लीगल सायन्सेस, बिझनेस मॅनेजमेंट आणि हेल्थ मॅनेजमेंट या क्षेत्रांतही उच्च शिक्षण घेतले. सन 2005 ते 2007 या कालावधीत त्यांनी तुळशी आय हॉस्पिटल येथे सेवा दिली. त्यानंतर 2007 पासून त्यांनी स्वतःची खासगी प्रॅक्टिस सुरू केली. ‘महाले हेल्थ फाउंडेशन’च्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी शिबिरे, शस्त्रक्रिया आणि आरोग्य उपक्रम राबवत त्यांनी समाजसेवेची परंपरा पुढे नेली आहे.
गेल्या 20 वर्षांपासून सिडको परिसरात त्या सातत्याने समाजकार्य करत आहेत. डोळे तपासणी शिबिरे आयोजित करणे, मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे, महिलांना शिलाई मशीन देणे, गरजू महिलांना नोकरी मिळवून देणे, तसेच बचत गटांच्या माध्यमातून मदत करणे अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी तळागाळातील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मधून शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि जवळपास 11 हजार मतांच्या आघाडीने विजय मिळवत नगरसेविका म्हणून निवडून आल्या. घराण्याच्या राजकीय वारशासोबतच नागरिकांशी असलेले त्यांचे ऋणानुबंध या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले. त्या लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात सज्ज झाल्या आहेत. सेवेची वाट चालत नेतृत्वाकडे हाच त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा सार आहे.
शब्दांकन :
जगदीश सोनवणे
9890929477

 

 

 

 

An inspiring journey

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago