अन राष्ट्रवादीच्या गोकुळ पिंगळे यांच्या होर्डिंगने वेधले लक्ष  

ठाकरेंचे स्वागत, राजकीय वर्तुळात चर्चा

नाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांचे होर्डिंग शहरात लक्षवेधक ठरले. होर्डिंगद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. त्यावर निर्धार विजयाचा नाशिकमध्ये परिवर्तनाचा असा त्यावर मजुकर आहे. दरम्यान यावरून शहरभर चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे. मुंबई नाक्या सह कॅनडा कॉर्नर परिसरासह शहराच्या मुख्य भागातील प्रथम दर्शनी होर्डिंग असल्याने त्या नजरेस असल्याने गोकुळ पिंगळे यांच्या होर्डिंगची यामुळे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.

मंगळवारी ठाकरे गटाचे राज्य अधिवेशन झाले यावेळी नाशिक जिल्हयासह राज्यभरातून पदाधिकारी दाखल झाले होते. यावेळी पिंगळे यांचे अगदी प्रथमदर्शनी होर्डिंग असल्याने त्यावर कुणाचीही आपसूक नजर जात होती.

नाशिक मध्ये मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन झाले. सकाळी महाअधिवेशन अन सायंकाळी उद्धव ठाकरे यांची सभा अनंत कान्होरे मैदनावर पार पडली. उद्धव ठाकरे नाशिक शहरात येत असल्याने त्यांच्या स्वागताचे आणि जाहीर सभेचे होर्डिंग ठाकरे गटाकडूनशहरभर लावण्यात आले होते. परंतु यात चर्चा झाली ती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांच्या होर्डिंगची. दरम्यान राज्यात शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी मध्ये फूट पडली. शरद पवार यांनी नाशिकमध्ये आपले बळ अधिक वाढविण्यासाठी नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांची टीम उभी केली. यामध्ये गोकुळ पिंगळे यांच्या गळ्यात नुकतीच प्रदेश उपाध्यक्ष पदाची माळ टाकण्यात येऊन त्यांना अधिक बळ देण्यात आले आहे. गोकुळ पिंगळे हे नाशिक लोकसभा मतदार संघांतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गट मागत आहे. तर शरद पवार गटाला देखील हीं जागा हवी आहे. अद्याप या जागेवर तोडगा निघाला नसून हीं जागा कोणाला सुटणार हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे पवार गट या जागेसाठी आग्रही असून गोकुळ पिंगळे यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीत अडीच वर्ष ठाकरे आणि शरद पवार गटाने सरकार चालवले. दीड वर्षांपूर्वी शिंदे गटाने आताची शिवसेना यांनी बंडखोरी केली आणि राज्यात भाजप सोबत सत्ता स्थापन केली. यानंतरही ठाकरे आणि पवार गट महाविकास आघाडीत आहे. सध्या दोन्ही पक्षांकडून शहरात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष वाढीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

नाशिकच्या जागेकडे लक्ष

नाशिक ची जागा कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पुढच्या काहीच दिवसात जागा वाटप होणार आहे. आता पर्यंत युतीत हीं जागा ठाकरे गटाला तर आघाडी मध्ये राष्ट्रवादी च्या वाट्याला होती. त्यामुळे हीं जागा दोन्ही पक्षांना हवी आहे. मध्यंतरी शहरात शरद पवार आले असता त्यांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी मात्र पवार यांनी नाशिकच्या जागे बाबत काही हीं झाले नसल्याचे सांगत धाकधूक वाढवली आहे. त्यामुळे सध्या नाशिक च्या जागेबाबत वेट अँड वॉच असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *