ओव्हरलोड ट्रक रस्त्याखाली उतरला अन पुढे असे काही घडले….

मनमाड जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार

बघा व्हिडिओ

मनमाड: प्रतिनिधी

मनमाड जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार बघायला मिळाला हा ट्रक जात असतांनाच काही अंतरावर जाऊन पलटी झाला सुदैवाने यात जीवित हानी टळली असली तरी यात चालक किरकोळ जखमी झाला आहे .ट्रकच्या मागे दुचाकी वरून चालणाऱ्या तरुणाने हा सर्व थरार मोबाईलमध्ये कैद केला असुन याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार पाहवयाला मिळाला असून ट्रक मध्ये क्षमते पेक्षा जास्त माल भरलेला होता त्यामुळे ट्रक एका बाजूने झुकलेला असताना देखील चालकाने त्याची पर्वा न करता ट्रक चालवीत होता अखेर मनमाड पासून काही अंतरावर एका बाजूने तोल जाऊन धावता ट्रक पलटी झाला.सुदैवाने ट्रक डाव्या बाजूने पलटी झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ट्रक उलटला. त्यामुळे

चालक जखमी झाला असून ट्रकचे देखील मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे एका बाजूने ट्रक झुकल्याचे पाहून त्याच्या मागे दुचाकी वरून चालणाऱ्या तरुणाने ट्रकचा थरार त्याच्या मोबाईल मध्ये कैद केला.  तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
ओव्हरलोड माल भरून अनेक ट्रक हायवे वरून धावत असतांना देखील आरटीओ, वाहतूक पोलीस करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

मेघा आहेर ठरली सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू

मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात मनमाड : प्रतिनिधी भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग…

49 minutes ago

बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला विहिरीत

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय मेशी : वार्ताहर खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी…

53 minutes ago

शिंदेसेना स्थानिक स्वराज्य संस्थेचे फुंकणार रणशिंग!

मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य…

57 minutes ago

तिसर्‍या श्रावण सोमवारच्या फेरीसाठी त्र्यंबकला भाविक दाखल

दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या तिसर्‍या सोमवारच्या ब्रह्मगिरी…

1 hour ago

खामखेड्यातील सालगड्याचा मुलगा झाला पोलीस

खामखेड्यातील सालगड्याचा मुलगा झाला पोलीस आदिवासी कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश महेश शिरोरे खामखेडा:…

4 hours ago

फेसबुकवर मैत्री: मित्राची गाडी थेट ओएलएक्सवर

फेसबुकवर मैत्री मित्राची गाडी थेट ओएलएक्सवर फेसबुक ओळखीचा गैरफायदा घेऊन गाडी विक्रीचा प्रयत्न शहापूर: साजिद…

1 day ago