फेसबुकवर मैत्री: मित्राची गाडी थेट ओएलएक्सवर

फेसबुकवर मैत्री मित्राची गाडी थेट ओएलएक्सवर

फेसबुक ओळखीचा गैरफायदा घेऊन गाडी विक्रीचा प्रयत्न
शहापूर: साजिद शेख
सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेऊन फसवणुकीच्या माध्यमातून गाडी विकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात पप्पु दामोर आणि सलीम शेख या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेली फेसबूकवर मैत्री आणि त्याच मैत्रीतून वापरण्यास दिलेली गाडी थेट विक्रीसाठी समाजमाध्यमावर काढल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादी यांच्या मालकीची रेनॉल्ड द्विबर कंपनीची काळ्या रंगाची गाडी दिनांक २६ जुलै २०२५ रोजी फेसबुकवर ओळख झालेल्या पप्पु दामोर (रा. धारावी) याने चालविण्यासाठी मागवली. त्याने आपल्या चालक सलीम शेख यास फिर्यादीकडे पाठविले. सलीम शेख याने बॉबी राजु कुंचीकोरवे नावाचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅनकार्ड दाखवून, तोच फेसबुकवरील पप्पु दामोर असल्याचे सांगितले.
तक्रारीनुसार, पप्पु दामोर आणि सलीम शेख यांनी संगनमत करून गाडी अप्रामाणिक पद्धतीने आपल्या ताब्यात घेतली. मात्र त्यानंतर २६  ते ३१ जुलै या कालावधीत फिर्यादीस गाडी परत न देता, त्यांच्या संमतीविना ओएलएक्सवर गाडी विक्रीसाठी जाहिरात टाकण्यात आली. या प्रकारामुळे फिर्यादीची फसवणूक झाल्याचे कळाले. त्यानंतर फिर्यादींनी बदलापूर  पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. या प्रकरणी  पोलिसांनी गुन्हा नोंदवून  तपास सुरू केला आहे.समाज माध्यमांवर झालेल्या ओळखीवर विश्वास ठेवून वाहन किंवा अन्य मौल्यवान वस्तू सुपूर्द करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यापूर्वीही असे अनेक प्रकार समोर आले होते. नागरिकांनी समाज माध्यमावर कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासन सातत्याने करत असते. मात्र नागरिक त्याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारात नागरिकांनी तातडीने पुढे येऊन तक्रार देण्याची गरज आहे. फसवणुकीचे पुढचे प्रकार थांबवण्यासाठी याबाबत जनजागृती करण्याचीही गरज व्यक्त होते आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

7 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago