नाशिक

शेगाव मधील आनंद सागर आजपासून भाविकांसाठी खुले

 

बुलढाणा:

राज्यातील मोठं देवस्थान असलेल्या शेगाव संस्थानने   2001 साली तत्कालीन विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून सरकारकडून जमीन लिझवर घेऊन त्यावर अतिशय भव्य धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची साडे तीनशे एकरवर उभारणी केली होती. अल्पावधीतच ‘आनंद सागर’मुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर येऊन याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढलं होतं. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानानं आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ‘आनंद सागर’मधील फक्त आध्यात्मिक केंद्र आजपासून सुरू होणार आहे.फक्त त्यातील मंदिरं आणि इतर सुविधा यांचाच लाभ आता भक्तांना मिळणार आहे.  हे अध्यात्मिक केंद्र आजपासून सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत निःशुल्क सुरू होत आहे.

 

Ashvini Pande

Recent Posts

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

9 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

9 hours ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

9 hours ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

12 hours ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

12 hours ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

12 hours ago