साडेतीन लाखांची लाच घेताना कार्यकारी अभियंता जाळ्यात
नाशिक: बांधकाम ठेकेदाराकडून साडेतीन लाखांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. महेश पाटील, रा. अष्टविनायक टॉवर, थत्ते नगर, गंगापूर रोड, नाशिक असे या अभियंत्याच नाव आहे, तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार आहेत, त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध रस्त्यांची नवीन तसेच डांबरीकरण कामे केली होती, तसेच सद्या च्या कालावधीत तक्रारदार यांच्या तीन नवीन कामाच्या निविदा मंजूर होऊन कार्यारंब आदेश देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता, परंतु कार्यकारी अभियंता शहादा विभाग यांनी टाळा टाळ चालवली होती, तक्रार दार यांचे तीन कोटी92 लाख 79 हजार एवढे प्रलंबित बिल काढणे व प्रस्तावित तीन कामांचे पाच कोटी 33 लाख रुपयांची कामांचे कार्यारंभ आदेश मिळण्यासाठी 43 लाखांची लाच मागितली होती, त्यापैकी साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना शहादा येथील शासकीय निवासस्थानी अभियंता पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले, ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायणराव न्हयालदे,, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ, हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावित, अमोल मराठे, ज्योती पाटील, मनोज आहिरे, संदीप नावाडे कर, जितेंद्र महाले यांनी हा सापळा यशस्वी केला,