करंट इश्यू
अश्विनी पांडे
शाहरूख खानच्या ओम शांती ओम चित्रपटातील लोकप्रिय संवाद ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ हे ऐकल्यानंतर जितकी उत्स्कुता निर्माण होणार नाही त्याहुन जास्त उत्स्कुता सद्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तोंडी असलेल्या संवादावरून निर्माण होत आहे. आणि महाराष्ट्रातील राजकारण क्लायमॅक्सला पोहोचले वाटत असतानाच थरारक घटना घडून पुढे काय होणार, याची उत्स्कुता निर्माण होत आहे.
हेही वाचा : भाजपाचा गनीमा कावा !.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अडीच वर्षापासून सुरू असलेला पॉलिटिकल ड्रामा थांबायचे नाव घेत नाही. सततच्या ट्वीस्ट ऍण्ड टर्नमुळे एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतकी रंजकता राजकीय पटलावर निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या काय चाललय म्हणल त्या प्रश्नाचे उत्तर असेल राजकारण. कारण कॉलेज असो वा गावाचा पार अथवा चहाची टपरी असो वा कॉर्पोरेट ऑफिस प्रत्येक ठिकाणी राज्याच्या राजकारणावर चर्चा सुरू आहेत. त्यात नागरिक आपापल्या गटाची अथवा पक्षाची बाजू घेऊन एकमेकांशी भांडत आहेत तर काही जण राजकीय विश्लेषकांप्रमाणे प्रत्येक घटनांच विश्लेषन करत आहेत. त्यात अनेक जण प्रेमात, युध्दात आणि सद्यस्थिती पाहता राजकारणातही सर्व काही शक्य असते, असे म्हणत सद्य राजकीय स्थितीचे समर्थन करताना दिसत आहेत. मात्र प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. त्या मर्यादेचा अंत झाला की निर्माण होते ती प्रचंड चीड किंवा त्याही पलिकडे जाऊन उद्गिगणता! महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातही संतापाबरोबरच उद्विगणता आहे. सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या वेळी ती न्यायालयात देखील दिसून आली. ठाकरे गटाची बाजू प्रभावीपणे मांडताना कपिल सिब्बल यांनी जोरकसपणे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, या मुद्दयावर भर देताना ही केस मी हरेन, किंवा जिंकेन हे महत्वाचे नाहीय, लोकशाही जी 1950 पासून चालत आली आहे. ती जगली पाहिजे, असे म्हणत आपल्या युक्तिवादाचा समारोप केला. ही पण एक प्रकारची उद्विगणताच आहे. सोशल मीडियावर जर नजर टाकली तर त्यातही सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रियेतूनही हेच समोर येते.
हेही वाचा :आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान
राजकारणात काय सुरू आहे, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्स्कुता असते. कारण राजकारणाची दशाच राज्याच्या विकासाची दिशा ठरवत असते. मात्र राजकीय पक्षाच्या राजकारणालाच काहीच दिशा राहिली त्यामुळे राज्याची दशा होणार हे निश्चित.
कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट ,भाजपा आणि शिवसेना शिंदे गट या प्रमुख पक्षामध्ये सद्या सुरू असणार्या राजकारणामुळे जनतेला किळस येत आहे. सतत टीका, आरोप, कुरघोडी यातच सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अडकून पडलेले दिसत आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाच्या प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही. जणू मुलभूत प्रश्न संपल्याप्रमाणे सर्वजण वावरताना दिसत आहे. विशेष करून इलेक्ट्रॉनिक मीडियावर सततच्या सुरू असणार्या आरोपांच्या फैरी पाहिल्यानंतर राज्यात सर्वच सुफलम मंगलम चालल्याचा आभास निर्माण होतो.