नाशिक महानगरपालिकेसह राज्यातील 18 पालिकेंची निवडणूक ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना या मुद्यांवरुन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. नाशिक महापालिके तील लोकप्रतिनिधीं चा कार्यकाल 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला. त्यानंतर निवडणूक पुढे पुढेच ढकलण्यात आली. राज्यात सत्त्ता उलथापालथ झाल्यानंतर शिंदे गटात नाशिकमधून अनेक पदाधिकार्यांनी प्रवेश केला. त्यामुळे पालिका निवडणुकीत नाशिककरांचा यंदा चा कल काय असणार हे, की आताच सांगणे कठीण आहे. मात्र सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली असून अनपेक्षित घटनांमुळे जनता बुचकळ्यात पडली आहे. अनेकजण या वर संताप व्यक्त करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजपाने नाशिकमध्ये निवडणुकीचे रणशिंग फूकले आहेत. ना. गिरीश महाजन यांनी तर नाशिक पालिकेत पुन्हा भाजपाचीच सत्त्त्ता येणार असल्याचा दावाच करुन टाकला आहे. नुकतेच शहरात भाजपाचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन झाले. या अधिवेशनाच्या माध्यमातून नाशिकमधील भाजप पदाधिकार्यांनी आगामी पालिका निवडणुकीचीच रणनिती असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. राज्यात ज्या पध्दतीने महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. ते सर्वसामान्य नागरिकांना पटलेले नाही, याची परतफेड जनता करणारच असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांसह महाविकास आघाडी कडून दररोज केला जातो आहे. तर भाजप-शिंदे गटाकडून महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला करत जनतेचे सरकार आम्ही बनवले असल्याचे सांगत आहे.