पंचवटी : वार्ताहर
मखमलाबाद येथून अपहरण केलेल्या मुलीची म्हसरुळ पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून यशस्वी सुटका केली. अपहरणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी व पीडीत मुलीला उत्तरप्रदेशमधून ताब्यात घेण्यात यश आले आहे.दिनांक 24 मार्च रोजी मखमलाबाद येथील शाळेतील विद्यार्थिनी आपल्या शाळेच्या कामासाठी 11.00 वाजता घरातून बाहेर पडली. परंतु ती संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी शाळा आणि आसपासच्या परिसरात शोध घेतला. पण ती मिळून आली नाही. यावरून म्हसरुळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला गेला.
पोलीस उपनिरीक्षक गजानन जोशी यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व खब-यांच्या माहितीच्या आधारे आरोपीचा मागोवा घेण्यात आला. प्रथम त्याचा लखनऊ येथे शोध घेतला गेला. परंतु तो तिथे सापडला नाही. पुढील तपासात आरोपी व पीडीत मुलगी अयोध्या-लखनऊ रस्त्यावरील रसुलपूर स्टॉपवर सापडले. यावरून पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आणि पीडीत मुलीला सुटका केली. मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
या तपास कार्यामध्ये सायबर पोलिस दलाच्या जया तारडे आणि भुषण देशमुख यांनीही महत्त्वाची माहिती दिली. या कारवाईमध्ये पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त पदमजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली, वपोनि अतुल डहाके, पोउपनि गजानन जोशी, पोहवा राकेश शिंदे, प्रशांत वालझाडे, बाळासाहेब मुर्तडक, पोअ भाऊराव गवळी, प्रमोद गायकवाड, मपोअ मेघा वाघ आणि राजश्री दिघोळे आदींनी विशेष परिश्रम घेतले
समृद्धी महामार्गाचे विविध टप्प्यांत लोकार्पण नाशिक : प्रतिनिधी समृद्धी महामार्गाच्या विविध टप्प्यांचे लोकार्पण विविध नेत्यांच्या…
सिडको ः विशेष प्रतिनिधी अंबड पोलीस ठाणे हद्दीत प्रवासादरम्यान चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने व ऑटोरिक्षासह…
शहापूर ः प्रतिनिधी मुंबई-नाशिक महामार्गाच्या कडेला झाडाझुडपांत एक कार आढळून आली. या कारमध्ये तीन जणांचे…
एजन्सीमार्फत वसुली; पत्र परत घ्या, अन्यथा आंदोलन : चारोस्कर दिंडोरी : प्रतिनिधी ग्रामपंचायत हद्दीतील घरांना…
श्रमदानातून नगरसूलच्या महाले वस्तीवर रस्ता तयार नगरसूल : प्रतिनिधी येथील महाले वस्तीवरील गेल्या चाळीस वर्षांपासून…
कापडी पिशवी वाटपासह प्लास्टिक बंदीचे आवाहन सिन्नर ः प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपा…