फसवणुकीची साडेतीन कोटींची रक्कम फिर्यादीला परत

 

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरातील सायबर पोलीस ठाण्याने एक महत्त्वपूर्ण आणि जलद कारवाई करत फिर्यादीला 48 तासांत सायबर फसवणूक झालेली साडेतीन कोटी रुपये परत केले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या जनतेचे शासक नाही तर सेवक या कल्पनेला मूर्त रूप देणारी ठरली.
याबाबत माहिती अशी की दि. 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. त्यांनी सांगितले की, एक अनोळखी व्यक्ती त्यांना फोन करून सांगितले की त्यांचे कुरीअर आले आहे. कुरीअर घेण्यासाठी त्यांनी मोबाइलवर आलेला ओटीपी पाठवा असे सांगून त्या व्यक्तीने त्यांचा मोबाइल हिसकावला आणि तो घेऊन पळून गेला. फिर्यादीच्या दोन्ही बँक खात्यांना जोडलेला मोबाइल लांबवला गेल्यामुळे त्यांना बँक खात्यातून पैसे चोरीला जातील.अशी भीती वाटल्याने फिर्यादीने तत्काळ आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतील अधिकार्‍यांना माहिती दिली.
शाखेतील अधिकारी यांनी खात्यांचे स्टेटमेंट तपासले आणि त्यात करंट खात्यातून 50 लाख रुपये व ओडी अकाउंटमधून 3 कोटी रुपये वर्ग झाल्याचे लक्षात आले. शाखा अधिकार्‍यांनी त्या खात्यांचे व्यवहार थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलली.
त्यानंतर, सायबर पोलीस ठाण्याने रकमेशी संबंधित एचडीएफसी बँकेच्या देवपूर शाखेतील खातेदाराचा शोध घेतला. तात्काळ बँक अधिकार्‍यांना संपर्क करून, फसवणुकीची रक्कम रोखण्याची सूचना दिली. त्या खातेदाराला नाशिक सायबर पोलीसांनी ताब्यात घेतले. दुसर्‍या दिवशी, खातेदाराने रक्कम फिर्यादीच्या बँक खात्यात परत केली. सायबर पोलीस ठाण्याने दिलेल्या या तात्काळ आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने फिर्यादी यांना त्यांची रक्कम 48 तासांच्या आत परत मिळाली. या कार्यवाहीमध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व सहकारी यांचे महत्वपूर्ण योगदान होते, तसेच बँकांच्या सहकार्यामुळे ही फसवणूक उघडकीस आली.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago