नाशिक बाजार समितीत पिंगळे गटाची सरशी

नाशिक बाजार समितीत पिंगळे गटाची सरशी

पंचवटी : सुनील बुणगे

नाशिक जिल्ह्याच लक्ष लागून असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठीची मतदान प्रक्रियेला सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सुरूवात झाली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १८ जागांकरिता होत असलेल्या निवडणुकीत तीन जागा बिनविरोध झाल्या असल्याने उर्वरित १५ जागांसाठी ३७ उमेदवारांसाठी शनिवार (दि.२९) रोजी मतदान मोजणी प्रक्रियेला शांततेत आणि चोख पोलीस बंदोबस्तात सुरूवात झाली असून यात पिंगळेंच्या आपलं पॅनलचे ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसुचित जमाती गटातून भास्कर गावित ८९९ मिळून विजयी झाले आहे . तर चुंभळे यांच्या शेतकरी पॅनलच्या यमुना जाधव यांचा २४९ मताधिक्याने पराभव झाला.

यात भास्कर गावित यांना ८९९ तर चुंभळे गटाच्या यमुना जाधव यांना ६५० मते मिळाली. तर अपक्ष अलका झोमन यांना २४१ मते मिळाली. या गटात एकूण २००० मतदान झाले तर वैध मते १७९० झाली. यात २१० अवैध मते आढळली. तर ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटात निर्मला कड ९९९ आणि सदानंद नवले ८१९ अशी मत मिळाली असून पिंगळे यांच्या आपल पॅनलचे निर्मला कड विजयी झाल्या .

Bhagwat Udavant

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

14 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

14 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

14 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

14 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

14 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

14 hours ago