नाशिक : प्रतिनिधी
नागरिक शिक्षक गौरव समिती आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शिक्षक गौरव समारंभ सप्टेंबर महिन्यात संपन्न होत असतो . कविवर्य कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार शिक्षक गौरव समारंभ करण्याचे निश्चित झाले आहे . त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे . प्राथमिक शिक्षक ( खासगी शाळा ) , प्राथमिक शिक्षक ( मनपा शाळा ) , उच्च माध्यमिक शिक्षक , महाविद्यालय शिक्षक , व्यावसायिक शिक्षक , क्रीडाशिक्षक , विशेष कार्य करणारे शिक्षक , संत साहित्याचे अभ्यासक , विशेष चित्रकला शिक्षक , चित्रकला शिक्षक , मुख्याध्यापक , संशोधक प्राध्यापक , कलाशिक्षक , शास्त्रीय संगीत शिक्षक , लोककला शिक्षक अर्ज भरू शकतात . ज्यांची कायम स्वरूपाची किमान २० वर्षे पूर्ण सेवा त्यातील नाशिक मनपा क्षेत्रात किमान सलग १० वर्षे सेवा झाली आहे त्यांनीच अर्ज करावेत . शिक्षक गौरव पुरस्कार फक्त नाशिक महानगरपालिका क्षेत्रापुरताच आहे . आपले अर्ज लवकरात लवकर दि . २० जुलैपर्यंत भरून पाठवावे , असे आवाहन नागरिक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष डॉ . यशवंतराव पाटील , उपाध्यक्ष राजेंद्र निकम व सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख सचिव डॉ . धर्माजी बोडके आणि नागरिक शिक्षक गौरव समिती यांनी केले आहे . ,
ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान...! मनमाड: आमिन शेख गेल्या तीन ते चार दिवसांपासून…
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…