मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांना यश
येवला : प्रतिनिधी
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून तिरुपती-साईनगर, शिर्डी-तिरुपती या नवीन साप्ताहिक रेल्वेला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. येवला व परिसरातील नागरिकांना तिरुपती व शिर्डी या धार्मिक स्थळांना जोडणार्या नवीन रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार आहे.
तिरुपती आणि शिर्डी या दोन प्रमुख आध्यात्मिक स्थळांदरम्यान प्रवास करणार्या लाखो भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, या मार्गावरील रेल्वे सेवांची संख्या वाढवण्याची तातडीची गरज होती. हाच मुद्दा अधोरेखित करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दि. 11 जून दि. 16 जुलै 2024 आणि दि. 20 जुलै 2025 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे शिर्डी-तिरुपती रेल्वेच्या फेर्या वाढवण्याची मागणी प्रामाणिकपणे आणि सातत्याने केली होती. या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, दि. 9 डिसेंबर 2025 पासून 17425/17426 तिरुपती-साईनगर शिर्डी या नवीन साप्ताहिक रेल्वेगाडीच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात आली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला प्रतिसाद देत घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले आहे. भाविकांच्या सुविधेसाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच दूरदृष्टी दाखवणारा आणि अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या निर्णयामुळे या नवीन सेवेच्या माध्यमातून तिरुपती आणि शिर्डी ही दोन अत्यंत महत्त्वाची आणि गर्दीची आध्यात्मिक केंद्रे आता नियमित रेल्वेने परस्परांशी जोडली जातील, ज्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर व तणावरहित
होणार आहे.
धार्मिक पर्यटनात होणार वाढ
उत्तर महाराष्ट्रातून तिरुपतीसाठी आतापर्यंत केवळ एका साप्ताहिक गाडीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना आता वाढीव फेर्या उपलब्ध होतील. ही रेल्वे शिर्डीहून सुटणार असल्याने तिकीट उपलब्धता वाढेल आणि मोठ्या प्रतीक्षा यादीची समस्या अत्यंत कमी होईल. शिर्डी तिरुपती रेल्वेला नगरसूल रेल्वे स्टेशनवर थांबा मिळाल्याने आपल्या येवला मतदारसंघातील स्थानिक रहिवाशांपासून ते दूरवरून येणार्या पर्यटकांसाठी तिरुपतीला जाण्याची सोय उपलब्ध होईल. वाढीव रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यामुळे तिरुपती आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणांच्या धार्मिक पर्यटनात मोठी वाढ होईल, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही थेट चालना मिळेल. 07637/07638 शिर्डी तिरुपती हॉलिडे स्पेशल आता नियमित गाडीमध्ये परिवर्तित झाल्याने आकारण्यात येणारे 1.3 पट प्रवासी भाडे आता कमी होईल तसेच सेवागुणवत्तेवरही सकारात्मक परिणाम होणार आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…