नाशिक

सतरा महिने कारवाईस टाळाटाळ करणारे गोत्यात?

माळेदुमाला सोसायटी अपहार प्रकरण, सखोल चौकशीची गरज

दिंडोरी : प्रतिनिधी
माळेदुमाला सोसायटीच्या कर्जवसुलीच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याच्या दाखल गुन्ह्यात तब्बल 17 महिन्यांनी संशयितांच्या अटकेनंतर सखोल चौकशीची गरज असल्याचा सूर उमटत आहे. त्यामुळे सतरा महिने कारवाईस टाळाटाळ करणारे अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे.
डिसेंबर 2023 मध्ये दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला सोसायटीतून सभासदांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम दोन कोटी 39 लाख 76 हजार 559 रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा सचिव दत्तात्रय कोरडे, जिल्हा बँकेचे तत्कालीन अधिकारी बाजीराव भदाणे व किशोर गांगुर्डे यांच्याविरोधात शासकीय लेखापरीक्षक विष्णू वारुंगसे यांच्या फिर्यादीवरून वणी पोलिसात दाखल झाला होता. या संशयितांविरोधात वणी पोलिस ठाण्याचे तत्कालीन अधिकर्‍यांनी कारवाई करणे आवश्यक होते. मात्र त्याला बगल दिली गेली. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने त्वरित कारवाई करणे कायद्याने बांधील असताना यात उदासीनता दाखवली. आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार राजू सुर्वे यांनी हाती घेतल्यानंतर हे पितळ उघडे पडले.
विशेष म्हणजे, सतरा महिन्यांच्या कालावधीत उजळ माथ्याने वावरताना वणी आदिवासी सोसायटीचे कामकाज सदर सचिव दत्तात्रय कोरडे पाहत होता. शासकीय लेखापरीक्षकांंच्या तक्रारीचे गांभीर्य प्रशासकीय यंत्रणांना नसावे, हे दुर्दैव. तेव्हा सामान्यांच्या तक्रारींचे काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.
तत्कालीन सहाय्यक निबंधकांनी सचिव कोरडे यांना निलंबित करावयास हवे होते. मात्र, माळे सोसायटीचा अपहार गुन्हा दाखल झाल्यानंतर काहीच झाले नाही. दरम्यान, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या निदर्शनास आर्थिक अनियमितता आल्यानेच पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांना सदर व संलग्न प्रकरणाच्या चौकशीची धुरा सोपवली.
कर्तव्यदक्ष राजू सुर्वे यांनी सखोल चौकशीस प्रारंभ करून अ‍ॅक्शन मोडला गती दिल्याने अपहार प्रकरणातून अनेकांनी वाहत्या गंगेत हात धुऊन दिन दोगुनी रात चौगुनी या म्हणीचा शब्दशः अर्थ घेतला की काय, याचा शोध घेतल्यास अनेकांचे पितळ उघडे पडणार आहे.

Gavkari Admin

Recent Posts

अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…

2 days ago

मालेगाव शहरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…

2 days ago

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा डंका

श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…

2 days ago

डॉ. नीलम रहाळकर यांचे उद्या ‘अरंगेत्रम्’; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना

डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…

3 days ago

कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ

कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…

3 days ago

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

4 days ago