नाशिक

आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली

यंदा राख्यांना महागाईची वीण

नाशिक : प्रतिनिधी
बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा दिवसांवर आला आहे. रक्षाबंधन सणासाठी लागणार्‍या राखीची खरेदी करताना सर्वसामान्यांना मात्र महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. यानिमित्ताने बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांची अनेक दुकाने थाटली आहेत. महिलांकडून आपल्या भावासाठी आकर्षक अशा राख्यांची राखी खरेदी करण्यात येत आहे. यंदा राख्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याने राखीच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

रक्षाबंधनासाठी ऑगिन्ड कॉकरोचेस, लेझर लाइट, कार्टून राखी, पारंपरिक गोंड्याची राखी, तसेच आकर्षक अशा डायमंड राख्यांना
मागणी आहे.
रक्षाबंधन सणाला विशेष महत्त्व आहे. बहीणभावाच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, आदर यांची वीण घट्ट करत बहिणींकडून भावांना राखी बांधून रक्षण करण्याची ओवाळणी मागण्यात येते.
अर्थात, भावांकडूनही बहिणीच्या सुख-
दुःखात साथ देणार असल्याचे सांगत नात्यातील जिव्हाळा वृद्धिंगत केला जातो.

आकर्षक राख्यांना मागणी

डायमंड राखी, रंगीबेरंगी चुडी राखी, तसेच बच्चेकंपनीकडून कार्टून कॅरेक्टरच्या राख्यांना अधिक पसंती देण्यात येत आहे.

राख्यांच्या किमतीत वाढ

पारंपरिक राख्यांची किंमत 5 ते 10 रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत आहे. डिझाइनच्या राख्यांची किंमत 20 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत आहे. यंदा राख्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांंनी वाढले आहेत.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago