मान्सूनचे आगमन पुन्हा लांबणीवर

15 जूनपर्यंत पेरण्या न करण्याचे शेतकर्‍यांना आवाहन

मुंबई :
राज्यात मान्सून दाखल झाला आहे. तळकोकणाच्या काही भागात वेगवान वार्‍यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. असे असले तरी यंदा राज्याच्या विविध भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
एका अहवालानुसार, राज्यातील 353 तालुक्यांपैकी 181 तालुक्यात कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 जूनपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. यामुळे शेतकरीवर्गाची चिंता वाढली आहे. मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकर्‍यांनी हवामान विभागाच्या या अंदाजानुसारच आपली शेतीची कामे करायला हवीत. कारण, 15 जूनपर्यंत पेरणीसाठीचा पाऊस पडणार नसल्याची माहिती सीएमओने दिली आहे. तसेच, शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असेही सांगण्यात आले. कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना
आवाहन करण्यात आले. तापमान वाढलेलेच राहणार
मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी आहे. आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. तसेच, विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्स्फॉर्मर, वीजखांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, अशी सूचना संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण प्रदेशातील काही भाग आणि मराठवाड्यात वादळी पावसाची स्थिती आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण कोकण, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कमीच आहे. तर राज्यातील उर्वरित बहुतांश भागांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला असून काही भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्र्ाात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागासह जगभरातील इतरही काही संस्थांनी यंदा एल निनोच्या प्रभावामुळे भारतासह दक्षिण आशियातील अनेक भागात कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेल्या उष्णता, उकाड्यामुळे नागरिक त्स्त्र्ाा झाले असून चातकाप्रमाणे मान्सूनच्या पावसाची वाट पाहिली जात आहे. सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रतागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

शेतकर्‍यांना मोठा फटका
किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे, तसेच कमी पावसामुळे राज्यातील काही भागासह देशाच्या काही भागात दुष्काळाचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसू शकतो.

Arrival of monsoon delayed again

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *