नाशिक

सिलिंडर पुरवठ्याअभावी आश्रमशाळा ‘गॅस’वर

प्रत्येकी दहा सिलिंडरसाठी प्रशासनाला पत्र

नाशिक ः प्रतिनिधी
अमेरिका- इस्रायल आणि इराण युद्धाची झळ देशालाही बसू लागली आहे. गॅस टंचाईच्या अफवांमुळे सर्वसामान्यांसह शालेय पोषण आहार, आदिवासी आश्रमशाळांमधून दिल्या जाणार्‍या भोजनावर याचा परिणाम झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय आश्रमशाळांमध्ये भोजनाचा ठेका दिलेला आहे. हा सर्व स्वयंपाक गॅसवर शिजविला जातो. त्यामुळे काल (दि.13)पासून तुटवडा जाणवण्यास सुरवात झाली आहे. ठेकेदारांकडून किचन चालविले जात असून, जास्त पैसे देऊन सिलिंडर आणून जेवण बनविण्याची वेळ आली आहे.
आदिवासी विकास विभागाकडून संबंधित विद्यार्थ्यांचा विचार करता पुरवठा अधिकारी, नाशिक यांना लागणार्‍या गरजेनुसार गॅस सिलिंडरची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, आदिवासी आश्रमशाळांमध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय नाही. मुबलक गॅसचा साठा उपलब्ध आहे. सेंट्रल किचनमधून विद्याथ्यार्ंना जेवण पुरविले जात आहे.कोेणत्याही प्रकारची गैरसोय नसल्याचा दावा केला जात आहे.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यार्ंना पोषण आहार दिला जातो. मुंढेगाव येथील सेेंट्रल किचनच्या माध्यमातून नाशिक विभागातील सिन्नर, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर येथील आश्रमशाळांना आहार पुरविला जातो. आतापर्यत कंत्राटदाराने अधिकच्या रकमेतून सिलिंडर आणून आहार पुरविला होता; परंतु आता गॅस टंचाईच्या अफवेने काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा दराने सिलिंडरची विक्री होत असल्याने ठेकेदारांनी तालुकास्तरावर प्रत्येक आश्रमशाळेला दहा सिलिंडरची मागणी पत्राद्वारे केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात एकूण 497 शासकीय आश्रमशाळा आणि 554 अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये निवासी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरविल्या जातात. बहिःस्थ विद्याथ्यार्ंना केवळ पोषण आहार दिला जातो.
आदिवासी विकास विभागातील 497 अनुदानित आश्रमशाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून जेवण पुरविले जाते. मुंढेगाव येथील सेेंट्रल विभागाद्वारे नाशिक विभागातील 45 आदिवासी आश्रमशाळांमधील 14 हजार विद्याथ्यार्ंना सकाळचा नाश्ता, दुपार व संध्याकाळचे जेवण पुरविले जाते.
प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या वसतिगृहांमध्ये त्यांना लागणार्‍या सिलिंडरची मागणी करणारे पत्र पुरवठा अधिकार्‍यांना देण्यात येणार आहे. तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांना प्रत्येक आश्रमशाळेसाठी दहा व्यावसायिक गॅस सिलिंडरची मागणी करण्यात आली आहे. गॅसटंचाईमुळे लाकडाची शोधाशोध, इलेक्ट्रिक शेगडीचा शोध घेतला जात आहे.इलेक्ट्रिक शेगडीचे दर 1200 वरून पाच हजारांवर गेल्यानेही ठेकेदारांनी चिंता व्यक्त केली आहे.

गॅस सिलिंडरचा कालपासून तुटवडा भासत असल्याचे ठेकेदारांकडून समजले आहे; परंतु आदिवासी विकास विभागाकडून संबंधित विद्यार्थ्यांचा विचार करता पुरवठा अधिकारी, नाशिक यांना लागणार्‍या गॅस सिलिंडरसाठी पाठपुराव्यासाठी पत्रव्यवहार सुरू झाला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत, अन्यथा आदिवासी विकास परिषदेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– इंजि. गणेश गवळी,
युवा प्रदेश अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्र

अप्पर आयुक्त कार्यालयाला पत्र दिले असून, लवकरात लवकर गॅस सिलिंडरचा पुरवठा व्हावा, अशी मागणी केली आहे.दीड दिवसाला एक मोठे सिलिंंडर आश्रमशाळेला लागते. बारावीच्या मुलांची परीक्षा झाल्याने ते गावी गेले आहेत; परंतु दहावीची मुले अद्याप परीक्षा देत आहेत. परीक्षा काळात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गॅस, इलेक्ट्रिक शेगड्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. एप्रिलअखेरपर्यंत सिलिंडरचा पुरवठा लागणार आहे. कोळशाचा पर्याय ठेवला आहे. कोळशाच्या भटट्यांचा दर 10 ते 12 हजार रुपये आहे. कमीत कमी दोन शेगड्या घ्याव्या लागणार आहेत. त्यावर मोठे पदार्थ करता येतील.पोळ्यांसाठी छोट्या चार शेगड्या घ्याव्या लागणार आहेत. त्यांची किंमत 2200 रुपये आहे. 12 ते 13 महिन्यांपासून आमचे बिले निघालेले नाही. त्यामुळे खर्च कसा निघणार, याची चिंता आहे.
– एक ठेकेदार

 

 

Ashram school runs on gas due to lack of cylinder supply

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago