नाशिक

आशियातील पहिली निमॅट्रॉनिक हत्तीण ‘एली’

पिटा इंडियातर्फे नाशिकमध्ये प्रथमच रोबोटिक हत्तीचे सादरीकरण

नाशिक : प्रतिनिधी
प्राण्यांच्या भावना, वेदना आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रभावी संदेश देणारी आशियातील पहिली निमॅट्रॉनिक हत्तीण ‘एली’ हिचे पिटा इंडियातर्फे नाशिकमध्ये प्रथमच सादरीकरण करण्यात आले. इस्पॅलिअर द हेरिटेज स्कूल येथे झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमात ‘एली’च्या जिवंत भासणार्‍या हालचाली आणि तिच्या हृदयस्पर्शी कथेमुळे शेकडो विद्यार्थी व शिक्षक भारावून गेले.
डोळे मिचकावणे, कान व सोंड हलवणे अशा हुबेहूब हालचाली करत ‘एली’ने आपल्या आयुष्याची कथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. लहानपणी आईपासून झालेली ताटातूट, सर्कशीत कैद असताना सहन करावा लागलेला छळ आणि अखेर सुटका होऊन अभयारण्यात मिळालेल्या मुक्त व आनंदी जीवनाची कहाणी ऐकताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. या कथेमधून प्राणी हेही माणसांप्रमाणे संवेदनशील असून, त्यांना वेदना, भीती, आनंद आणि प्रेमाची अनुभूती होते, हा संदेश ठळकपणे देण्यात आला.
पिटा इंडिया, इस्पॅलिअर द हेरिटेज स्कूल आणि उपाध्याय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, डॉ. प्राजक्ता जोशी, पिटा इंडियाच्या शिक्षण व्यवस्थापक मीनाक्षी नारंग, मीनल शाह व अनुष्का यादव उपस्थित होते.
यावेळी दत्तात्रय कराळे म्हणाले की, निसर्ग, प्राणी आणि विद्यार्थी यांच्याकडून आपण नेहमीच काहीतरी शिकत असतो. प्राण्यांबद्दल दयाळूपणा व करुणा निर्माण करण्यासाठी ‘एली’सारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत. शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी सांगितले की, ‘एली’च्या जिवंत भासणार्‍या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना हत्ती हे जंगलातील प्राणी असून, मनोरंजनासाठी कैदेत ठेवणे अयोग्य आहे, हे प्रभावीपणे समजले. या उपक्रमामुळे शाळेत सर्व सजीवांबद्दल आदरभाव निर्माण करणार्‍या चर्चा
सुरू झाल्या.डॉ. प्राजक्ता जोशी यांनी ‘एली’ हत्तीण ही प्राणी कल्याणाचा संदेश देणारी प्रभावी माध्यम ठरत असल्याचे नमूद केले. उपाध्याय फाउंडेशनच्या सहसंस्थापक बृंदा उपाध्याय यांनी या उपक्रमाचा उद्देश मुलांच्या मनात करुणा जागवणे आणि प्राणी हे संवेदनशील सजीव आहेत, याची जाणीव करून देणे असल्याचे सांगितले. पिटा इंडियाच्या शिक्षण व्यवस्थापक मीनाक्षी नारंग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्राण्यांनाही शांततेत जगण्याचा अधिकार असल्याचे अधोरेखित केले.
मे 2023 मध्ये पिटा इंडियाने तयार केलेली ‘एली’ ही सिलिकॉन व फायबरपासून बनविण्यात आली असून, ती अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या आवाजात कथा सांगते. नाशिकमधील 16 शाळांना ‘एली’ भेट देणार असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्राण्यांविषयी संवेदनशीलता, दयाळूपणा आणि आदरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Asia’s first nematronic elephant ‘Ellie’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago