नाशिक

लाडक्या बहिणींच्या मतांवर इच्छुकांची भिस्त!

होम मिनिस्टर कार्यक्रमांबरोबरच सहलींचाही धडाका

नाशिक ः प्रतिनिधी
महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेश, बिहार राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहिणी आता महापालिकेतही आपला करिष्मा दाखवू शकतात. ही शक्यता गृहीत धरून अनेक इच्छुक लाडक्या बहिणींच्या मतांवर डोळा ठेवून आहेत. लाडक्या बहिणींना खूश करण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवित आहेत. होम मिनिस्टरसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पैठणीचे वाटप असो वा वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी अथवा पर्यटनाच्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या सहलीचे नियोजन केले जात आहेत. यातून मतं फिक्स करण्याचा इरादा इच्छुकांचा दिसून येत आहे.
महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. शहरात पन्नास टक्के मतदान हे लाडक्या बहिणींचे आहे. त्यामुळे हे मतदान आपल्याला मिळावे, असा प्रत्येक इच्छुक उमेदवाराचा आटापिटा सुरू आहे. त्यासाठीच निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच प्रभागातील इच्छुकांनी होम मिनिस्टरसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले. काहींनी लाडक्या बहिणींची पिंपळगाव येथील मधमाशी उद्यान, खाटू श्याम, भिलमाळ आदी ठिकाणी सहलीचे नियोजन केले होते.
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी गेमचेंजर ठरल्याचे विधानसभा निकालावरून दिसून आले होते. महायुतीचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणींसाठी 1500 वरून 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. महापालिका किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होऊ घातल्या आहेत. महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार आहेत.
निवडणुकीसाठी सध्या शहरात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. लवकरच कोणाला तिकीट मिळते, याकडे लक्ष लागले आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपा.राष्ट्रवादी (अ.प. गट) आणि विशेषतः शिवसेना शिंदे गटाने जिथे संधी मिळेल, तिथे लाडक्या बहिणींचा मुद्दा वारंवार वापरून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत चुकीचे प्रकार घडल्याने केवायसी करण्यात येऊन योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणींचा हप्ता खात्यावर जमा झालेला नसल्याने आणि आता निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हप्ता लांबणीवर पडला आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळ आली की लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची पुन्हा एकदा लाडक्या बहिणींवरच भिस्त असल्याचे चित्र आहे.

 

Aspirants rely on the votes of their beloved sisters!
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago