प्रभाग 26 मध्ये अतिक्रमणांवर बुलडोझर

सातपूर : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 26 मधील शिवशक्ती चौकातील जॉगिंग ट्रॅकलगत असलेल्या महापालिकेच्या जागेवरील 15 ते 20 अतिक्रमित घरे अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबीच्या सहाय्याने उद्धवस्त केली.
दरम्यान महापालिका प्रशासनाने अतिक्रमणधारकांना महिन्याभरापूर्वीच सूचना दिली होती. मात्र त्यानंतरही ही घरे अतिक्रमण धारकांनी न सोडल्याने काल महापालिकेकडून संयुक्त कारवाई करण्यात आली. मनपा अतिक्रमणविरोधी पथक कारवाई करणार असल्याने अगोदर सर्व अतिक्रमितघरांना आपले साहित्य काढण्यासाठी 1 तासाचा अवधी दिल्यानंतर अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली.यावेळी कारवाई दरम्यान अतिक्रमित घरातील एकाने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
या कारवाईप्रसंगी सातपूर विभागीय अधिकारी नितीन नेर ,सिडको विभागीय अधिकारी मयूर पाटील, नगररचना विभागाचे गोकुळ पगारे,अतिक्रमण विभागाचे तानाजी निगळ, मयूर काळे, मिलिंद जाधव, सत्यम शिंदे,उमेश खैरे,सचिन सनस, विजय सपकाळ, प्रमोद आवाळे,गौतम खरे, विद्युतविभागाचे संजय पाटील, दिलीप मोकाशी यांसह मनपाच्या चारही विभागातील वाहने, अतिक्रमण,विद्युत,पाणीपुरवठा आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी, पोलिस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *