लासलगाव : प्रतिनिधी
येथील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये एटीएम पिन जनरेट करण्याच्या बहाण्याने ५६ वर्षीय व्यक्तीस दोघा भामट्यांनी १ लाख ५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात प्रकाश दौलत बोंडे (५६) रा. सुभाष नगर यांनी फिर्यादी दिली आहे.
बोंडे हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पत्नीचे कार्ड घेऊन गेले.पत्नीच्या नावावरील एटीएम पिन जनरेट करत असतांना तेथे अगोदरच असलेल्या दोघांनी मदत करण्याच्या बहाण्याने दुसरेच एटीएम कार्ड देऊन सुमारे एक लाख पाच हजार ५५२ रुपयांची रक्कम काढून घेतल्याची घटना घडली.याबाबत दिनांक ९ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखीं विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…