दोन कंपनी कामगार गंभीर जखमी; हल्लेखोर पसार
सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात रविवारी सकाळी घडलेल्या हल्ल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कंपनीत कामावर जाणार्या दोन युवकांवर अज्ञात चार जणांनी धारदार आणि कठीण वस्तूंनी हल्ला करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर हल्लेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील विल्होळी येथील संशयित सोनू कांबळे याला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अन्य संशयित फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज बेडसे, रोहित शेळके आणि पवन शिगवन (तिघेही रा. महाकाली चौक) हे सकाळी कंपनीत कामानिमित्त जात असताना त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. त्यामुळे ते त्रिमूर्ती चौकाजवळील दत्त मंदिर बसस्टॉप नजीकच्या पेट्रोलपंपावर थांबले. याच वेळी चार अज्ञात युवकांनी त्यांना शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला चढवला. हातात लोखंडी रॉड, चॉपर, कोयता घेऊन दोन युवकांना जबर मारहाण केली.
या मारहाणीत एका युवकाच्या डोक्याला, पायाला व पोटाला तर दुसर्या युवकाच्या हाताला व पाठीला धारदार शस्त्राने वार केल्याने गंभीर दुखापत झाली.
या हल्ल्यात सूरजच्या डोक्याला, पायाला आणि पोटाला तर रोहितच्या हाताला व पाठीवर गंभीर दुखापत झाली. पवन शिगवन हा मात्र थोडक्यात बचावला. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना भरदिवसा आणि गजबजलेल्या भागात घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा गंभीरतेने तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अंबड पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…
अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…
पिंपळगावच्या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याची तब्बल 15…
केंद्रास लावले कुलूप; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा दिंडोरी ः प्रतिनिधी वरखेडा (ता. दिंडोरी) येथील…