नाशिक प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवडे येथे बापलेकावर जमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना त्रंबकेश्वर तालुक्यातील तळवडे येथें घडली, या हल्ल्यात अंकुश बोडके आणि पंढरीनाथ बोडके हे बापलेक जखमी झाले. सोसायटीचे चेअरमन पद न मिळाल्याने हा हल्ला झाला, या हल्ल्यात लाठ्या काठ्याचा वापर करण्यात आला, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.या हल्ल्याच्या वेळी आमदार हिरामण खोसकर आणि संपत सकाळे उपस्थित होते असा आरोप हल्ल्यात जखमीनी केला आहे.