पुणे : पुण्यात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर १० ते १२ जणांनी हल्ला केला आहे . या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे . आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला . यावेळी तसेच यावेळी गद्दार गद्दार अशी घोषणाबाजीही करण्यात आली . आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानं तर तेथून उदय सामंत यांचा ताफा जात होता . यावेळी सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला . दरम्यान , या हल्ल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे . हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे . आक्रमक भाषणांमधून असे प्रकार घडत आहेत . आक्रमक भाषण करण्याचा उद्देश हाच आहे . त्यामुळेच शिवसैनिकांमध्ये रोष आहे . त्यासाठी आदित्य ठाकरेंची यात्रा सुरू आहे , असे केसरकर म्हणाले .
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…