चौघांना अटक
मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील आयशानगर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व्हे नं. 67, प्लॉट नं. 4/4, 36 खोली परिसरात सोमवारी (दि.) सायंकाळी पाचच्या सुमारास कौटुंबिक वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
याबाबत जमीरुद्दीन मोईनुद्दीन कुरेशी (वय 31, रा. बिस्मिल्लानगर, सर्वे नं. 56) यांनी आयशानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचा मेहुणा सय्यद जुबेर सिराजअली (वय 26) हा फिर्यादीच्या बहिणीस नांदवत नसल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये मागील काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळी फिर्यादीची पत्नी घराजवळील सार्वजनिक शौचालय परिसरात कचरा टाकण्यासाठी गेली असता तिचा फिर्यादीच्या बहिणीच्या सासूसोबत शाब्दिक वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी फिर्यादीचा भाऊ समीर घटनास्थळी गेला असता आरोपी सय्यद जुबेर सिराजअली, त्याचा भाऊ अजिज ऊर्फ शादाब सिराजअली (वय 20), वडील सय्यद सिराजअली (वय 56) व अबरार सय्यद सिराजअली यांनी समीर याच्यावर लाकडी दांडके, लोखंडी पाइप, तसेच धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केले.
यावेळी फिर्यादीच्या पत्नीच्या मानेवर लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. फिर्यादीसही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी आयशानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. सपोनि पाटील तपास करीत आहेत.
Attempt to kill a youth in Aishanagar
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…