नंबर ब्लॉक केल्याने युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न

प्रियकराचे मित्रांच्या मदतीने कृत्य, कामगारनगरची घटना

सातपूर : प्रतिनिधी
प्रेयसीने मोबाइल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने मित्रांना तिच्या मागावर पाठवत डोळ्यात मिरची पूड टाकत हल्ला केला. तसेच अपहरण करत हल्ला केल्याचा प्रकार कामगारनगर येथे घडला. सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
पीडित युवतीने तक्रार दिली. संशयित आनंद राजभर (रा. सोमेश्वर कॉलनी) याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने युवतीने संशयितासोबत संबंध तोडले होते. त्यामुळे तिने त्याचा मोबाइल नंबरही ब्लॉक केला. संशयिताचा संपर्क होत नसल्याने त्याचा राग अनावर झाला होता. माझी नाही तर दुसर्‍या कोणाचीही होऊ देणार नाही, या विचारात त्याने रागातून तीन मित्रांना युवतीच्या मागावर पाठवले.
तिघांना दुचाकी देत तिच्यावर पाळत ठेवण्यास सांगितले. कुठेही दिसली तर प्राणघातक हल्ला करण्यास सांगितले होते. सायंकाळी 6.30 वाजता युवती कामगारनगर येथे किराणा दुकानात आली असता दुचाकीवरील तीन संशयितांनी युवतीला रस्त्यात अडवले. तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला. काही नागरिकांनी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी युवतीला पकडून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तपास करत संशयित राजभर याला अटक केली. तीन संशयितांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहिरे तपास करत आहेत. दरम्यान, कामगारनगर परिसरात टवाळांचा हैदोस वाढला आहे. रात्रीही येथील रस्त्यांवर टवाळखोर रात्री उशिरापर्यंत बसून असतात. या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Attempted kidnapping of young woman after blocking number

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *