नाशिक

नैसर्गिक नाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न पडला महागात

नाशिक : प्रतिनिधी

अनधिकृतपणे नैसर्गिक नाला बंद करून काम करणार्‍या विकासकावर महापालिकेच्या वतीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यानुसार मिळ्कतधारक तिवारी व अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटीतील पालिकेचे शाखा अभियंता पंकज अरुण बाप्ते यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पंचवटी विभागातील म्हसरूळ शिवारातील वरवंडी रस्त्यावरील नैसर्गिक नाला बंदिस्त करण्याचा प्रकार सुरू असल्याचे समजताच पालिकेने तिवारी व अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, म्हसरूळ शिवारातील वरवंडी रस्ता येथील परिसरात शाखा अभियंता बाप्ते हे गुरुवारी (दि. 2) पाहणी करत असताना त्यांना स.न. 71 व स.नं. 171 च्या लगतच्या नाल्यामध्ये 600 मी. व्यासाचे तीन रांगेत आरसीसी पाइप टाकून प्रवाहित असलेला नैसर्गिक नाला बंदिस्त करण्याचे काम विनापरवानगी सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी मिळकतधारक यांच्या वतीने पाइप टाकणार्‍या मक्तेदार यांना सुरू असलेले अनधिकृत काम तात्काळ बंद करण्यास सांगितले आहे. सदर जागा ही कोणाच्याही मालकीची नसून, नैसर्गिक नाल्याची जागा आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966) मधील कलम 52 नुसार जागेच्या वापरात विनापरवानगी बदल/अनधिकृत बांधकाम करणे अवैध असून, मिळकतधारकांनी मनपाची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे सदर नैसर्गिक नाला आरसीसी पाइप टाकून बंदिस्त करत आहेत. त्यानुसार मिळकतधारक तिवारी व अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शाखा अभियंत्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच पालिका आयुक्त रमेश पवार यांनी शहरात कुठेही रस्त्याचे अनधिकृतपणे खोदकाम होत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानंतर आता पालिकेला अनधिकृतपणे नैसर्गिक नाला बंद करणारे विकासक आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात अशाच पद्धतीने नैसर्गिक नाल्यामध्ये पाइप टाकून ते बुजवण्यात आले आहे. याचा पालिकेने तपास करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा नाशिक दौरा रद्द

नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…

8 hours ago

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…

22 hours ago

शिंदे टोलनाक्यावर कारला आग

शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…

24 hours ago

मनपा आयुक्त पदाबाबत मोठा ट्विस्ट, कार्डिलेची बदली रद्द, मनीषा खत्री यांची नियुक्ती

नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…

1 day ago

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…

1 day ago

नाशिक मनपा आयुक्तपदी राहुल कर्डीले

नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…

3 days ago