नाशिक :प्रतिनिधी
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइन (आयएनआयएफडी) नाशिक केंद्राच्या फॅशन डिझाइन शाखेच्या विद्यार्थ्यांचे शनिवारी दि १० रोजी हॉटेल डेमॉक्रॉसी रिसॉर्ट व कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘ऑरा २०२३’ या रंगारंग फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. या फॅशन शोमध्ये इन्स्टिट्यूटच्या २०० विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध कलेक्शन सादर झाले. यंदा या लोकप्रिय उपक्रमाचे आठवे वर्ष होते. या उपक्रमाची विद्यार्थी, पालक, फॅशनप्रेमी नाशिककर व फॅशन व्यवसायिक या सोहळ्याची आतुरतेने वाट बघत होते. दुपारपासून रात्रीपर्यंत हा सोहळा रंगला. २५ छोटया मुलामुलींनी सहभागी होत फॅशन शो सादर केला. लोकप्रिय मॉडेल्सनी रॅम्पवॉक करत फॅशनच्या दुनियेचे नेत्रदीपक दर्शन घडवले.
मान्यताप्राप्त शैक्षणिक व प्रतिष्ठित संस्था म्हणून आयएनआयएफडी इन्स्टिट्यूटची ख्याती आहे. देशभरात १८० केंद्रांमधून फॅशन व इंटिरिअर डिझाईनचे विविध अभ्यासक्रम राबविले जातात. आतापर्यंत ५ लाखांहून अधिक विद्यार्थी येथे घडले असून विविध ठिकाणी यशस्वी करिअर करीत आहेत. ख्यातनाम फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्रा, ऍशले रिबेलो, ट्वींकल खन्ना यांचे आयएनआयएफडी संस्थेला कायमच पाठबळ मिळते. बदलत्या जीवनशैलीला अनुसरून फॅशन डिझाइनचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना शिकविण्यात येतात. त्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी अनेक उपक्रम देखील वर्षभर राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आयएनआयएफडी इन्स्टिट्यूटच्या नाशिक शाखेतर्फे विद्यार्थ्यांच्या शिक्षण कौशल्याचे सादरीकरण करण्यासाठी फॅशन शो झाला. फॅशन विश्वातील नामवंतांसमोर आपले कलाकौशल्य दाखवण्याची संधी त्यामध्ये मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या इंटेरियर डिझाईन विभागाच्या विद्यार्थ्यांनी फॅशन शो साठी सर्व सेट्स तयार केले.
फॅशन डिझाइन उद्योगातील संधी अधोरेखीत करणाऱ्या या शोमध्ये ‘ किड्स फॅशन शो ‘ देखील सादर करण्यात आला. त्यात तीन प्राथमिक फेऱ्या व सायंकाळी ग्रँड फिनाले झाला. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्तपणे दाद दिली. मुंबईतील ख्यातनाम मॉडेल्स रॅम्पवर सहभागी झाल्या. त्यात नीलाक्षी सोधी, सप्तशिखा नाथ, रिचा गायकर, प्रियांका अहिर, पूजा वाघेला, तन्वी माने, आशिता साहू यांचा समावेश होता. नाशिक केंद्रातील अनुभवी व तज्ज्ञ फॅशन फॅकल्टीजच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कलेक्शन सादर करण्यात आले. त्यात पारंपरिक व वेस्टर्न आऊटफिट्सचा समावेश होता. यावेळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील झाले. या उपक्रमासाठी आयएनआयएडीचे तज्ज्ञ मार्गदर्शक तनबीर भाटिया, दीप्ती सोनवणे, रेखा हरवानी, स्वर्णिमा सरण, प्रिया पाटील, किरण ढाळे आदींचे मार्गदर्शन लाभले . त्यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी ‘ऑरा २०२३’ च्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. या रंगारंग कार्यक्रमास 10 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी, पालक, फॅशन क्षेत्रातील जाणकार व रसिक नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना
मिळाले हक्काचे व्यासपीठ
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘ऑरा २०२३’ महत्वाचा ठरला. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी दरवर्षी जून महिन्यात आयएनआयएफडीच्या माध्यमातून प्रदर्शन व फॅशन शोचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांनी तयार केलेल्या वस्त्रांना चांगली मागणीही मिळते. यावर्षीही चांगली विक्री झाली. कोविडमुळे यंदा तीन वर्षांनी होणाऱ्या या उपक्रमाबद्दल मोठी उत्सुकता होती. सकाळच्या सत्रात १५० विद्यार्थ्यांचा दिमाखदार पदवीदान समारंभ झाला. यंदाच्या उपक्रमाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारी आहोत.
– सुरजितसिंग मनचंदा, संचालक, आयएनआयएफडी ( नाशिक शाखा )
विद्यार्थ्यांसाठी उघडतील अनेक संधींची दारे…
मला माझ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा खूप अभिमान आहे. या फॅशन शोचे श्रेय आयएनआयएफडीच्या नाशिकमधील टीम व विद्यार्थ्यांचे आहे. आम्ही प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना अशाप्रकारे उत्तम शो देत राहू. ‘यंदा नाशिक शाखेत ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इंटेरिअर आणि फॅशन क्षेत्रात प्रशिक्षण घेतले. हा शो त्यांनी वर्षभर शिकलेल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी होती.’ त्यातून अनेक संधींची दारे उघडतील व त्यांना आत्मविश्वासाने आव्हाने पेलण्याचे बळ मिळेल. भारतातील वस्त्र प्रावरणांना परदेशातून मागणी वाढली असून पारंपरीक व आधुनिक फॅशनचा समन्वय बघायला मिळतो. फॅशन शो प्रसंगी
आयएनआयएएफडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल खोसला यांनी पत्रकार परिषदेत असे मत व्यक्त केले.
नाशिकच्या छोटया मुलींना रॅम्पवॉक करण्याची संधी !
फॅशन शोचे मीडिया पार्टनर नम्रता जाहिरात संस्थेचे संचालक आबा देशमुख म्हणाले, नाशिकच्या छोट्या मुलींना या मोठया मंचावर रॅम्पवॉक करण्याची संधी आम्ही मिळवून दिली. त्यांच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नव्या फॅशन्स त्यांनी आत्मविश्वासाने सादर केल्या. मच्छिन्द्र देशमुख म्हणाले, एका मोठया इव्हेन्टचा भाग आम्हाला होता आले याचे समाधन आहे.
16 जणांचा मृत्यू; मुंबईची पुन्हा तुंबई मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला…
गंगापूर व दारणा धरणातून विसर्ग वाढणार नागरिकांना सतर्कतेचे आवाहन नाशिक : प्रतिनिधी शहर आणि…
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…