रविवार, ११ जून २०२३. जेष्ठ कृष्ण अष्टमी. शोभन नाम संवत्सर. राशिभविष्य

 

राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

 

आज चांगला दिवस आहे.

 

चंद्र नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ/मीन.

 

मेष:- अध्यात्मिक लाभ होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मन आनंदी राहील. खरेदी होईल.

 

वृषभ:- आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. दिवस आनंदात घालवाल. मेजवानी मिळेल.

 

मिथुन:- प्रसन्न कालावधी आहे. छोटी सहल कराल. कामाच्या ठिकाणी मान मिळेल. बुद्धीचातुर्य कामास येईल.

 

कर्क:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. वाहन सुख लाभेल. लक्ष्मी प्रसन्न राहील.

 

सिंह:- नोकरीसाठी प्रवास घडेल. मात्र त्यातून लाभ होतील. व्यावसायिक गाठीभेटी होतील. गैरसमज मात्र टाळा.

 

कन्या:- ग्रीष्माच्या गरम हवेत सुखाची शीतल लहर येईल. प्रेमात यश मिळेल. जोडीदार आनंदी राहील.

 

तुळ:- नोकरीच्या ठिकाणी आवडत्या व्यक्तीकडून सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. दिवस आनंदात घालवाल. शुभ समाचार समजतील.

 

वृश्चिक:- काही कामे पुढे ढकलली गेली तरी त्यातून लाभच होईल. कोडी सुटतील. सूचक घटना घडतील.

 

धनु:- तत्वज्ञानाची आवड निर्माण होईल. मुक्तीची, मोक्षाची आस लागेल. पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.

 

मकर:- धाडसाने अर्थार्जन कराल. कालाक्षेत्र खुणावेल. प्रणयरम्य दिवस आहे. मात्र पत्नीचे हट्ट पुरवताना खर्च वाढेल.

 

कुंभ:- घरातील गरजा पुरवण्यासाठी भ्रमंती करावी लागेल. तरुणांचे हृदय चोरीला जाण्याची शक्यता आहे.

 

मीन:- आत्मशोध घेतला जाईल. मोलाचा उपदेश मिळेल. हातून लेखनकार्य घडेल. प्रेमी युगुलाना अनुकूल दिवस आहे.

 

(. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago