मी आहे देश की पेहचान, अभिमान अन् शान. कलाकाराच्या कारागिरीतून एकाग्रतेने विविधतेतून नटून साकारलेली साडी.
रेशीम अन मायेच्या सुतापासून विणलेली. कधी असते सिम्पल साधी कधी असते भरजरी. मी असते बनारसी, कांजीवरम, चिकनकरी, कलमकारी, पश्मिना भागलपुरी, म्हैसूर सिल्क साडी, नऊवारी सहावारी पैठणी सिल्क साडी, मुंगा इरकल कसावू, पोचम्मपल्ली, बांधणी, पटोला, साडी…
माझा प्रवास गृहउद्योग, ग्रामोद्योग ते टेक्स्टाइल.
कधी नेसली जाते मी क्लॉकवाईस तर कधी नेसली जाते मी अँटी क्लॉकवाईस. इन डिफरंट अँड मेनी स्टाईल. असतो मला पदर जो दर्शवितो आदर. माझी क्वालिटी ठरवली जाते अककॉर्डिंग टु प्राईस. नेसल्यावर मी दिसते नाईस. कधी होते क्लिक, कधी होते सिलेक्ट, कधी होते रिजेक्ट आहे मला चॉईस. भेद मानत नाही मी, नाही मी मानत साईझ. मुली ते स्त्री मी आहे पहिली पसंत. लहान असो वा थोर, गरीब असो वा श्रीमंत. देशातून विदेशाकडे आहे माझी ख्याती उगाच नाही पैठणी सातासमुद्रपलीकडे पोहोचली. कधी सौभाग्याचे लेणे, कधी आठवणीतील देणे, कधी मानपानातील देणेघेणे. पाठवणीचा प्रवास ते आठवणीतून साठवणीचा अट्टाहास. हजर असते नेहमी सण, समारंभ अन सोहळ्यास. तरुणपण, बाईपण, आईपण अन म्हातारपण जपणारा क्षण खास. माहेरच्या साडीपासूनचा सुरु माहेरच्या साडीपर्यंतचा अखेरचा प्रवास. स्त्री आणिी मी आहोत एकमेकांस. नेसल्यावर शौर्य, स्वाभिमान, भारदस्त वजनदार व्यतिमतत्व दर्शविते. कधी लाजविते तर कधी हर्षविते. हीच तर आहे माझ्यातील गोडी मी आहे साडी. कधी असते स्पेशल, कधी असते ऑप्शनल, कधी वाटते हवीहवीशी, तर कधी वाटते नकोशी. प्रत्येक वेळी मीच असते कम्फर्टेबल तिच्यासाठी.
Autobiography of Sari
अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…
प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्या…
अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…
मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…
व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्याचे वर्गीकरण करण्यात अपयश…
पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…