नाशिक

स्टाइसवर आवारेंची सत्ता

सहकार उद्योग विकासला 8 तर उद्योजक विकासला 4 जागा स्टाइस बचावचा सुपडा साफ
सिन्नर:
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या  निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक  नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखालील सहकार उद्योग विकास आघाडीने 12 पैकी 8 जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली तर आमदार माणिकराव कोकाटे समर्थक सुधा माळोदे, माजी चेअरमन अविनाश तांबे, पंडितराव लोंढे यांच्या नेतृत्वाखालील उद्योजक विकास पॅनलला 4 जागा मिळाल्या. दिलीपराव शिंदे, किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्टाइस बचाव पॅनलचा सुपडा साफ झाला.  तिरंगी झालेल्या या निवडणुकीत वसाहतीचे संस्थापक नानासाहेब गडाख यांची कन्या सुधा माळोदे गडाख यांच्या नेतृत्वाखालील उद्योजक विकास व माजी चेअरमन दिलीपराव शिंेदे यांच्या नेतृत्वाखाली स्टाइस बजाव असे आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांचेच दोन पॅनल झाल्याने त्याचा फायदा नामकर्ण आवारे यांना झाला.

क्रॉस वोटींगमुळे या निवडणुकीत पाडा-पाडीच्या राजकारणाचा प्रत्यय आला. कारखानदार मतदार संघातील 7 जागांपैकी आवारे यांच्या सहकार उद्योग विकास आघाडीला 5 तर उद्योजक विकास पॅनलला 2 जागा मिळाल्या, महिला राखीव गटातून दोन्ही पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाली तर इतर मागास प्रवर्गातून उद्योजक विकास पॅनल व अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग व भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून आवारे गटाने विजय संपादन केला.

Bhagwat Udavant

Recent Posts

तब्बल 17 महिन्यांनी तीन संशयितांना अटक

माळेदुमाला सोसायटी अपहार प्रकरण, 10 जूनपर्यंत कोठडी दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील माळेदुमाला सोसायटीत दोन कोटी…

5 minutes ago

मालेगावला बस-ट्रकच्या अपघातात प्रवासी जखमी

मालेगाव : येथील राष्ट्रीय महामार्गावरील फाउंटन हॉटेलजवळ रविवारी (दि. 8) दुपारी साडेतीनच्या दरम्यान राज्य परिवहन…

11 minutes ago

अंबडमध्ये दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

घातक शस्त्रसाठ्यासह पोलिसांची कारवाई सिडको विशेष प्रतिनिधी : अंबड परिसरातील घरकुल योजना, चुंचाळे शिवार येथे…

17 minutes ago

बुलेट चोर व खरेदी करणार्‍याला अटक

नाशिक शहरातील बुलेट चोरीचे 6 गुन्हे उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक शहरातील विविध पोलीस…

24 minutes ago

दरोड्याच्या तयारीत असलेले सराईत जेरबंद

सिडको : विशेष प्रतिनिधी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून,…

29 minutes ago

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष ट्रेनचा मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्र शासन आणि भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक…

35 minutes ago