अवयव दान सर्वश्रेष्ठ दान…. असे म्हटले जाते. विविध आजारांमुळे किंवा अपघातामुळे अवयव गमावलेल्या किंवा अवयव निकामी झालेल्या व्यक्तींना आपण आपले अवयव दान करून त्यांना नवीन जीवन देऊ शकतो. मागील काही वर्षांत विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अवयव दानाची चळवळ जोर धरू लागली आहे. लोकांनाही अवयव दानाचे महत्व पटल्याने स्वतःहून लोक अवयव दानासाठी पुढे येत आहेत. अवयव दानाबाबत आपल्याकडे कायदा आहे. कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती स्व इच्छिने अवयव दान करू शकतो. अर्थात ते केल्यानंतरही त्या व्यक्तीला निर्विधपणे जीवन जगता येईल अशाच अवयवांचे जिवंतपणे दान करता येते. मागील काही वर्षात मात्र जिवंत व्यक्तीच्या अवयव दानाचा धंदा बनल्याची तक्रार वैद्यकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून सातत्याने होत आहे. देशात अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे असाही आरोप केला जात होता. आता या आरोपाला पुष्टी देणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील एका मोठ्या प्रसिद्ध रुग्णालयात एका महिलेला फसवून तिच्या शरीरातील किडनी काढून घेण्यात आली. ज्या महिलेची किडनी काढून घेण्यात आली त्या महिलेला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन पाळले नाही म्हणून त्या महिलेने पोलिसात तक्रार केली. महिलेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला आणि पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले. संबंधित महिलेची किडनी ज्या व्यक्तीला देण्यात आली ती व्यक्ती त्या महिलेचा पती असल्याचे भासवून कायदेपालन होत असल्याचा देखावा करण्यात आला त्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली. या प्रकरणाचा तपासानंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या ट्रस्टीसह, डॉक्टर, संबंधित महिला, ज्या व्यक्तीस किडनी मिळाली ती व्यक्ती व मध्यस्थ अशा सर्वांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाच्या आणखी खोलात जाऊन पोलीस तपास करीत आहेत. पुण्यात घडलेले हे पहिले प्रकरण नसावे याआधी असे अनेक प्रकरणं घडली असतील. केवळ पुण्यातच नव्हे तर देशातील अनेक मोठ्या शहरातील प्रसिद्ध रुग्णालयात अशा प्रकारचे रॅकेट चालू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत भारत जगात अमेरिकेनंतर दुसर्या क्रमांकाचा देश आहे. अवयव प्रत्यारोपण करणार्या रुग्णालयांवर कायदे पालन करण्याची जबाबदारी रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. दाता आणि रुग्ण यांच्यात होणार्या आर्थिक व्यवहाराची करण्याची जबाबदारी रुग्णालयावर टाकली तर अवयव प्रत्यारोपण करण्यास रुग्णालये पुढे येणार नाही त्यामुळे रुग्णांची अडचण होईल असे रुग्णालयाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले आहे. न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच पुण्यातील घटना घडली त्यामुळे त्यामुळे अवयव दानाच्या चळवळीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे अवयव दानाच्या चळवळीला ब्रेक लागू नये ही अपेक्षा. मुळात ही चळवळ अवयव दानाची आहे. ते दान आहे. जिथे दान दिले जाते तिथे कोणत्याही पातळीवर पैशाचा व्यवहार होत नसतो. येथे तर अवयवांची तस्करी होत आहे. अवयव तस्करीचे मोठे रॅकेट राज्यात कार्यरत असून त्यात अनेक मोठे धेंडे सामील असण्याची शक्यता आहे. या रॅकेटचे पाळेमुळे खणून काढली पाहिजे आणि दोषींना कडक शासन केले पाहिजे अन्यथा अवयव तस्करीचा हा गोरखधंदा असाच सुरू राहील.
श्याम ठाणेदार
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…
बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…