नाशिक

बाळ येशू यात्रेला उत्साहात प्रारंभ

 

 

बाळ येशू यात्रेला उत्साहात प्रारंभ

नाशिक : प्रतिनिधी

शहरातील नाशिकरोड परिसरात असलेल्या सेंट झेवियर हायस्कूलच्या मैदानात बाळ येशू यात्रेला शनिवार (दि.11) पासून प्रारंभ झाला. दोन दिवसीय यात्रेसाठी देशभरातून ख्रिस्ती  भाविक आले आहेत. अनेक भाविक रेल्वेने तर अनेक भाविक खासगी वाहनाने आले होते…भाविकांमुळे नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या उपनगर ते बिटको चौकादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षार्ंपासून निर्बंध असल्याने यात्रा मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत झाली. यंदा मात्र भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

मेणाच्या वस्तू अर्पण

पापक्षालनासाठी धर्मगुरुंद्वारे देवाची माफी मागत होते. तर अनेक भाविकांनी पूर्वी केलेला नवस पूर्ण झाला म्हणून तसेच नवस करण्यासाठी बंगला, हात, पाय, डोळे, चारचाकी, शांतता यांचे प्रतीक असलेल्या मेणाच्या वस्तू अर्पण करीत होते. तसेच शनिवारची मुख्य मिस्सा ही बिशप लुर्डस डॅनियल, धर्मगुरू एरल फर्नांडिस यांच्या उपस्थितीमध्ये झाली.

यात्रास्थळी विविध दुकाने थाटली

यात्रेनिमित्त बाळ येशू मंदिराच्या बाहेर विविध प्रकारच्या दुकानांसह खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटलेली होती. तर खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच बाळ येशू मंदिराच्या आवारात पिलग्रीम व रिट्रीट हाऊस व सभागृहात भाविकांची सोय करण्यात आली होती. शाळेच्या मैदानात मिसासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. या ठिकाणी दर तासाला प्रार्थना केली जात होती. तर फादर अगस्ती न डिमेलो फादर एअरोल फर्नांडिस फादर टोनी फादर लोगो व सहकारी दोन महिन्यांपासून यात्रेची तयारी करीत होते.

भाविकांनी केली प्रार्थना

मंडपात एकाच वेळी किमान दहा ते पंधरा हजार भाविक देवाची प्रार्थना करताना दिसून येत होते. शनिवारी दिवसभरात इंग्रजी, तामिळ, मराठी व कोकणी भाषेत मिस्साबली (प्रार्थना) भक्ती करण्यात येत होती. यावेळी एसव्हीपी मंडळाच्या स्वयंसेवक सोफिया गोन्साविस, अँथोन भोसले, नितीन गायकवाड, राजेश देठे, ज्योती परेरा, अँग्नेस फ्रान्सिस, मिनी रॉबिन यांनी आलेल्या भाविकांना मार्गदर्शन करीत त्यांना सेवा दिली. यावेळी द्राक्ष, बेदाणे, स्ट्रॉब्रेरी, मेणबत्तीसह खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली होती.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago